भाजपा सांगली शहर जिल्हा वतीने सांगली शहरातील मध्यवर्ती स्टेशन चौकातून बीएसएनएलची दोन कोटी रुपयांची केबल चोरी प्रकरनात महाविकास आघाडीचा नगरसेवक सहभाग असल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार
गुरुवार दि. ३ फेब्रुवारी २०२२ :- सांगली शहरातील मध्यवर्ती स्टेशन चौकातील एस एफ सी मॉल ते काँग्रेस भवन पर्यंतची बीएसएनएलची करोड़ो रुपये किंमतीची कॉपर केबल चोरीला गेली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मध्ये क्रेनच्या सहाय्याने जमिनीमधून खोदून ही केबल चोरी करण्यात आली आहे. या चोरीसाठी क्रेनचा वापर करण्यात आला पोलीस चौकशी मध्ये क्रेन चालकाकडे चौकशी केली असता विजयनगर मधील एका महाविकास आघाडीच्या नगरसेवकाच्या सांगण्यावरून क्रेन त्या ठिकाणी आणण्यात आली असल्याची शक्यता आहे. अशी माहिती मिळत आहे. या सर्व प्रकरणामुळे शहरातील शेकडो बीएसएनल फोन बंद पडले आहेत या आता सदर संशयित नगरसेवक महाविकास आघाडीच्या व मंत्रीमहोदय व वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.
यामध्ये बी.एस.एन.एल अधिकारी देखील सहभागी असल्याची शक्यता आहे. तसेच यावेळी संशयित व्यक्तींचे सीडीआर तपासण्यात यावेत. त्यामुळे या प्रकरणात जातीने लक्ष घालून योग्य तपास करून चौकशीअंती संबंधित संशयित नगरसेवकावर व इतर दोषी व्यक्तिवर कडक कार्यवाही करावी व कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. या प्रकरणाचा योग्य तो तपास व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी सांगली मुख्यालय येथे होम dysp सुरेखा दुगे मॅडम यांना निवेदन दिले. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने पोलीस दलाच्या बाजूने उभी आहे. वेळप्रसंगी न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून सर्व प्रकरणाची माहिती संघटक सरचिटणीस दीपक माने यांनी दिली यावेळी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका कल्पना कोळेकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, युवा नेते विशाल मोरे, प्रियानंद कांबळे, अमित भोसले, अक्षय पाटील, राहुल माने, महेश सगरे, प्रसाद व्ह्ळकुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.