Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील जिल्हा मध्यवर्ती बँक विविध पुरस्कार वितरण सोहळा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक - स्व. गुलाबराव पाटील प्रतिष्ठान,सांगली

सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील जिल्हा मध्यवर्ती बँक विविध पुरस्कार वितरण सोहळा  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक - स्व. गुलाबराव पाटील प्रतिष्ठान,सांगली



सहकार महर्षि कै.गुलाबराव पाटील यांनी उत्तम प्रशासक व कुशल संघटक म्हणून सहकार क्षेत्रात केलेले कार्य, त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये संस्थांची झालेली नेत्रदिपक प्रगती  व पर्यायाने संस्थांचे जाळे पसरलेने, त्यांचेमध्ये झालेली गुणात्मक व संस्थात्मक वाढ तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दिर्घकाळ अध्यक्ष व संचालक म्हणून केलेले उत्कृष्ट कामकाज याबाबीचा विचार करुन बँकेच्या आवारामध्ये कै.गुलाबराव पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा दि.21/01/2013 रोजी बसविणेत आलेला आहे.

सहकार महर्षि कै.गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रामध्ये केलेले भरीव कार्य व त्यापासून स्फूर्ती व प्रेरणा घेणेसाठी बँकेचे वतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक - स्व.गुलाबराव पाटील प्रतिष्ठान सांगली या नावाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, सांगली यांचेकडे दि.06/04/2015 रोजी स्वतंत्र संस्थेची नोंदणी करणेत आलेली आहे.

या संस्थेचा प्रमुख उद्देश हा जिल्ह्यातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या निरनिराळ्या सहकारी संस्था, व्यक्ती यांना स्व.गुलाबराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिवशी पुरस्कार देऊन गौरव करणे हा आहे. त्यानुसार दि.21 जानेवारी 2022 रोजी स्व.गुलावराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिवशी खालीलप्रमाणे सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार देणेचे निश्चित करणेत आलेले होते. 

अ.नं. संस्था/व्यक्ती प्रकार पुरस्कार संख्या

1 उत्कृष्ट विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या जिल्ह्यातून 3

2 उत्कृष्ट विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या - सचिव जिल्ह्यातून 3

3 उत्कृष्ट सांगली जिल्हा बँक शाखा जिल्ह्यातून 3

4 उत्कृष्ट सांगली जिल्हा बँक अधिकारी/कर्मचारी जिल्ह्यातून 3

वरीलप्रमाणे संबंधित संस्था, व्यक्ती, बँकेची शाखा, बँक अधिकारी/कर्मचारी यांची संस्था कामकाजातील प्रगती, संस्थेची आर्थिक स्थिती, सामाजिक कामकाज, सहकार संवर्धनासाठी केलेले विशेष प्रयत्न, व्यवस्थापन, संगणकीकरण, सेवा कालावधीमध्ये प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता, प्राप्त झालेले पुरस्कार या महत्वाच्या बाबी विचारात घेऊन पुरस्काराची निवड करणेत आलेली असून प्रकारनिहाय पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत. पुरस्काराचे स्वरुप हे रोख रक्कम व शिल्ड असे आहे.

अ.नं. संस्था/व्यक्ती प्रकार पुरस्कार मिळालेल्या संस्थेचे/व्यक्तीचे नांव

1 उत्कृष्ट विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या पुरस्कार

1 श्री.बाजीराव बाळाजी पाटील ऐतवडे खुर्द सर्व सेवा सहकारी सोसा. लि., ऐतवडे खुर्द ता.वाळवा

2 अंकली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.,अंकली ता.मिरज

3 उटगी सर्व सेवा सह.सोसा.उटगी ता.जत

2 उत्कृष्ट विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या सचिव पुरस्कार

1 श्री.बाबूराव दत्तात्रय माने, सचिव,  टाकळी सर्व सेवा सह.सोसा.लि., टाकळी ता.मिरज

2 श्री. चंद्रकांत महादेव सपकाळ, सचिव,  श्री.बाजीराव बाळाजी पाटील ऐतवडे खुर्द सर्व सेवा सहकारी सोसा. लि., ऐतवडे खुर्द ता. वाळवा

3 श्री.लियाकत हैदर नंदूर, सचिव,  उटगी सर्व सेवा सह.सोसा. उटगी ता.जत

3 उत्कृष्ट सांगली जिल्हा बँक शाखा पुरस्कार

1 शाखा - खानापूर ता.खानापूर

2 शाखा - ओझर्डे ता.वाळवा

3 शाखा - इस्लामपूर शहर ता.वाळवा

4 उत्कृष्ट सांगली जिल्हा बँक अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार

1 श्री.भरत शंकर पिंगळे, शाखाधिकारी शाखा- शाळगांव

2 श्री.अनिल आण्णासो सुर्यवंशी, पासिंग ऑफिसर,  शाखा - कवठेमहांकाळ

3 श्री.अमरसिंह वसंतराव कोळी , शिपाई,  मुख्य कार्यालय, सांगली.

  वरील प्रमाणे सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्काराचे वितरण सोमवार दि.07 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयाकडील मा.वसंतरावदादा पाटील सभागृहामध्ये मा.ना.जयंतराव पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते करणेत येणार असून या समारंभाचे अध्यक्ष मा.ना.डॉ.विश्वजीत कदम, सहकार व कृषि राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे आहेत. कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक सदस्य उपस्थीत रहाणार आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा.आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.