Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभाग घ्या - तहसिलदार प्रदीप उबाळे

 राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभाग घ्या - तहसिलदार प्रदीप उबाळे



सांगली, दि. 24,  : भारत निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा, व्हीडिओ तयार करणे, पोष्टरची डिझाईन स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेची सविस्तर माहिती http://ecisveep.nic.in/contest/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्च 2022 पर्यंत असून या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन 283-इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा वाळवा-इस्लामपूर तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे.

स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ईमेल करताना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहनही तहसिलदार प्रदीप उबाळे यांनी केले आहे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.