निवडणुकांच्या तोंडावरच राम रहिमची तुरुंगातून सुटका
चंदीगड : बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची फर्लोवर तुरुंगातून सुटका होणार आहे. गुरमीत हरियाणातील रोहतक तुरुंगात बंद आहे.
पंजाबमधील निवडणुकीच्या काहीच दिवस आधी त्यांची तुरुंगातून सुटका होत आहे. पंजाबमधील 23 जिल्ह्यांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, जे राज्याच्या राजकारणात थेट सामील आहेत. पंजाबमधील माझा, मालवा आणि दोआबा भागात या डेरांचे वर्चस्व आहे.
डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्ह्यात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे 69 जागांवर त्याचा प्रभाव आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हरियाणा तुरूंग विभागाने सिरसा डेरा प्रमुख राम रहीमच्या 21 दिवसांच्या फर्लो (रजा) अर्जाला मंजुरी दिली आहे. रोहतक आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर त्याला तुरुंगाबाहेर आणले जाईल.
राम रहीमला घेण्यासाठी सिरसा डेरा येथून ताफा रवाना
सिरसा डेरालाही राम रहीमला रजा मिळाल्याची माहिती मिळाली आहे. तेथे उपस्थित भाविकांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. तेथून एक ताफा राम रहीमला घेण्यासाठी रोहतकच्या सुनारिया कारागृहात रवाना करण्यात आला आहे. दोन साध्वींवर बलात्कार आणि दोन हत्या केल्याप्रकरणी राम रहीम सुनारी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.