Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर सर केले सांगलीच्या रणरागिणीनी

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर सर केले सांगलीच्या रणरागिणीनी

सांगली : सांगलीच्या रणरागिणीनी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाईचे शिखर सर केले आहे. याबद्दल सांगलीच्या या रणरागिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगलीतून 29 जाने व 30 जाने रोजी सह्याद्री ट्रेकर्स सांगली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचे व्हरेस्ट शिखर म्हणून ओळखले जाणारे कळसूबाई शिखर सांगलीतील महिलांनी यशस्वीरीत्या पार केले.

या मोहिमेत सांगलीतून कीर्ती सुजितकुमार काटे , तृप्ती स्वामी, स्वाती ओकारे , उर्मीली पाटील, वैशाली कवठेकर नंदाताई खराडे , बबुताई पाटील,  प्रभावती भोसले, तबसुम मुजावर, सुचिता भोकरे या महिलांनी शिखरावर अतिशय अवघड व दुर्गम असणारी वाट आपल्या पायाखाली तुडवत या रगरगिनीनी मोहिमेत हिरीरीने सहमाग घेत यशस्वी रित्या घेवून 1646 मीटर उंचीचे कळसुबाई शीखर सर केले.

या ट्रेक मध्ये सह्याद्री ट्रेकर्स सांगलीचे वैभव बंडगर,  युवराज साठे , दिलीप गोसावी, अजित पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या सर्व महिलांच्या या धाडसी कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.