डीएमके नेत्याची ६ जणांनी केली निर्घृण हत्या
मडिपक्कममध्ये डीएमकेच्या नेत्याची सहा जणांनी हत्या केली. मंगळवारी रात्री झालेल्या पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यावर झालेल्या हल्ल्यात डीएमकेच्या नेत्याचा मृत्यू झाला. सी सेल्वम असे मृत्यू झालेल्या नेत्याचे नाव आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या जागावाटपाचे काम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या या हत्येनं खळबळ उडाली आहे. डीएमकेचे राजाजी नगर वॉर्डमधील सचिव सी सेल्वम यांच्यावर पक्षाच्या ऑफिसमधून बाहेर पडताना हल्ला करण्यात आला. हल्लेखोर बाइकवरून आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर डबा धरून बसलेल्या ६ जणांनी सिल्वम यांच्यावर हल्ला केला हल्ल्यानंतर स्थानिकांना सी सेल्वम हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यांनतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी क्रॉमपेट शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
सी सेल्वम यांच्या हत्येनंतर त्यांच्या समर्थकांनी काचेच्या बाटल्या फोडून गोंधळ घातला आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर सेल्वम यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.