मोदी सरकारमुळेच चीन-पाक एकत्र; आता राहुल गांधींच्या टीकेवर अमेरिका म्हणते.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेत केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. "केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र आले. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांना याबाबत विचारण्यात आला.
पण त्यांनी आपल्य़ा उत्तरात सांगितले की, मी अशा विधानाचे समर्थन करत नाही. असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या कारभारवर प्रश्न उपस्थित केला आहे.
संसदेत केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "तुमच्या धोरणाने चीन आणि पाकिस्तानला एकत्र आणण्याचे काम केले आहे, आणि हे भारतासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.चीनची स्पष्ट योजना आहे आणि त्याचा पाया डोकलाम आणि लडाखमध्ये घातला गेला आहे. सरकारने काश्मीरबाबतही चुकीचा निर्णय घेतला आहे." अशी टीकाही त्यांनी केलीय. आता राहुल गांधींच्या वक्तव्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेचे स्पष्टीकरण
या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, "पाकिस्तान आणि चीनने त्यांच्यातील संबंधांवर त्यांनी बोलले पाहिजे. पण मी अशा विधानाचे समर्थन नक्कीच करणार नाही. यानंतर नेड प्राइस यांना विचारण्यात आले की, पाकिस्तान चीनसोबत मिळून काम करत आहेत असे तुम्हाला वाटते? अमेरिकेने त्यांना वेगळे ठेवले असे तुम्हाला वाटते का?"
यावर नेड प्राइस म्हणाले की, "आम्ही जगाला स्पष्ट केले आहे की, कोणत्याही देशाला अमेरिका आणि चीन यापैकी कोणाचीही निवड करण्याची गरज नाही. जेव्हा अमेरिकेशी संबंध येतो तेव्हा देशांना पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे. ते म्हणाले, पाकिस्तान आमचा राजकीय मित्र आहेत. इस्लामाबाद सरकारशी आमचे महत्त्वाचे संबंध आहेत. हे असे नाते आहे ज्यावर आपण विविध आघाड्यांवर लक्ष केंद्रित करतो."
संसदेत राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी संसदेत म्हणाले की, "तुम्ही धोक्याशी खेळत आहात. माझा सल्ला आहे थांबा. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या सीमावादावर राहुल गांधी म्हणाले की, धोक्याला हलक्यात घेऊ नका. तुम्ही चीन आणि पाकिस्तानला एकत्र आणले आहे. चीनची स्पष्ट योजना आहे यात मला शंका नाही. त्याचा पाया डोकलाम आणि लडाखमध्ये घातला गेला आहे. हा देशासाठी मोठा धोका आहे. जम्मू-काश्मीर आणि परराष्ट्र धोरणात तुम्ही मोठ्या धोरणात्मक चुका केल्या आहेत. तुम्ही दोन आघाड्यांचे एका आघाडीत रूपांतर केले आहे."
राहुल गांधी पुढे म्हणाले की, "तुम्ही चीनकडे पहा ते कशाप्रकारे शस्त्रे कशी खरेदी करत आहेत. आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे. तुम्ही आमचे ऐकणे हे देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे. आपण कदाचित विचार करत असाल की, तुम्ही विचार करताय की नाही हे माहित नाही, परंतु आम्हाला माहित आहे. काही झाले तर त्याला तुम्ही जबाबदार असाल," असे राहुल म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.