Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्ताप्रकार 'ई' मधील नागरिकाचे प्रश्न सोडवणुकीसंदर्भात चर्चासत्रात व मार्गदर्शन मंगळवारी बैठक पृथ्वीराज पाटील यांची माहिती

सत्ताप्रकार 'ई' मधील नागरिकाचे प्रश्न सोडवणुकीसंदर्भात चर्चासत्रात व मार्गदर्शन मंगळवारी बैठक पृथ्वीराज पाटील यांची माहिती


सांगली, दि. ५ :  सत्ताप्रकार 'ई' मधील जाचक अटीतून सांगली शहरातील व्यापारी आणि नागरिकांच्या मिळकती मुक्त करण्यासंदर्भात मंगळवार, दि. ८ रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल ककून, कृष्णा कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी स्टेडियम जवळ, सांगली येथे संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. 

ते म्हणाले, शहरातील अशा मिळकती सत्ताप्रकार 'ई' मधून मुक्त करण्यासंदर्भात नुकताच शासन निर्णय झालेला आहे. यासंदर्भात आपण महसूल मंत्री ना.  बाळासाहेब थोरात यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार हा आदेश निघालेला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मिळकती मुक्त करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे.

या बैठकीत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात नागरिकांना माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याकरीता मा. प्रांताधिकारी  समीर शिंगटे, जिल्हा अधीक्षक, भूमीअभिलेख, श्री. जाधव, नगरभूमापन अधिकारी श्रीमती ज्योती पाटील व अप्पर तहसीलदार श्रीमती अर्चना पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तरी सत्ताप्रकार ई धारक असलेले नागरिक आणि व्यापाऱ्यांनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.