Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्योजकांना आयईएम डेटा अद्ययावत करण्याचे आवाहन

 उद्योजकांना आयईएम डेटा अद्ययावत करण्याचे आवाहन


सांगली, दि. 4,  : सर्व उद्योजकांनी DPIIT पोर्टल (G२B) व्दारे त्यांचा IEM  डेटा पुन्हा अद्ययावत करावा. तसेच जे उद्योग घटक प्रत्यक्षात उत्पादनात गेले आहेत अशा सर्व उद्योग घटकांनी आयईएम पार्ट बी घेण्याचे आवाहन ‍जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभाग नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 1991 ते 2021 या कालावधीतील उद्योजकांनी भरलेल्या औद्योगिक आवेदनपत्रांची छाननी करून अप्रचलित डाटा नष्ट करण्याचे व डाटा अद्यावत करण्याचे काम करण्यात येत आहे. या विभागाव्दारे दि. 25 मार्च 2021 पासून औद्योगिक आवेदन पत्रे (IEM) भरण्यासाठी सुधारीत G२B पोर्टल (http:/services.dipp.gov.in/lms) लाँच केले असून सदर पोर्टलमध्ये अर्जदाराला त्यांच्या IEM संदर्भात डेटा अद्ययावत / पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्या Accounts मध्ये लॉग इन करून एक स्वतंत्र विंडो प्रदान केली आहे. यासाठी कोणतेही शुल्क देय असणार नाही.

अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी G२B  पोर्टलमध्ये वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्यूटोरियल उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व आईएम धारकांनी त्यांच्या डेटामध्ये कोणताही बदल नसला तरीही अर्ज पुन्हा भरणे आवश्यक आहे. अर्जांची पडताळणी केल्यानंतर अर्जदारांना ऑनलाईन सिस्टीमव्दारे QR कोडसह पोच पावती दिली जाणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.