भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी
सांगली दि.6 : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली असून या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी परक्राम्य संलेख अधिनियम 1881 (सन 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार सांगली जिल्ह्यात सोमवार दि ७ फेब्रुवारी रोजी दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.