सांगलीत ६३ लाख ५० हजाराची रोकड सापडली
सांगलीत नाकाबंदीवेळी एका इनोव्हा कारमध्ये ६३ लाख ५० हजाराची रोकड सापडली आहे. या चौकशीसाठी इनोव्हा कारसह ६३ लाख ५० हजाराची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विश्रामबाग पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान ही रोकडे सापडली आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम T अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले आणि उपविभागीय अधिकारी अजित टिके यांनी दिलेल्या सूचनेनुसार विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १०० फुटी परिसरात विश्रामबाग पोलीसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या दरम्यान एका इनोव्हा कारची झडती घेतली असता यामध्ये ६३ लाख ५० हजाराची रोकड आढळून आली. याबाबत एपीआय अमितकुमार पाटील यांनी रकमेबाबत विचारणा करता त्यामुळे इनोव्हा कारसह ६३ लाख ५० इनोव्हामध्ये असणाऱ्या व्यक्तीकडून हजाराची रोकड समाधान कारक उत्तर आले नाही.
घेतली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी याबाबत इन्कम टॅक्स विभागाला बोलावून या रकमेबाबत माहिती दिली. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. सदरची कारवाई ही विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी दिले सुचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अधिकारी सपोनि / अमितकुमार पाटील, सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ/आदिनाथ माने, पोना/ दरिबा बंडगर, पोना / किरण कांबळे, पोका/ संदिप घस्ते, पोकों/ महमद मुलाणी, पोकॉ/ ऋतुराज होळकर, पोकों/ सुनिल कोकाटे तसेच विश्रामबाग पोलीस ठाणेकडील अंमलदार पोहेका/ होळकर, पोकों/ जगताप, पोकॉ/ बामणे, पोकॉ/ बंडगर, पोकॉ/ घाटगे, चालक सपोफो / पाटील यांनी केली आहे. तसेच सदर रोख रक्कमेचा अधिकचा तपास विश्रामबाग पोलीस ठाणेकडील सपोनि अमितकुमार पाटील व आयकर विभाग, कोल्हापुर हे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.