कोल्हापुरात हायकोर्ट खंडपीठ व्हावे : सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची जोरदार मागणी
सांगली दि. १: कोल्हापूर,सांगली ,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे म्हणून या सर्व जिल्ह्याचे अनेक वकील व खंड खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी गेली तीस वर्षे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या पाच जिल्ह्यातील अनेक खटले मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित आहेत. खंडपीठ व्हावे यासाठी या जिल्ह्यातील वकील संघटनाही सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मुंबई उच्च न्यायालय हे या पाच जिल्ह्यातील लोकांना दूरचा प्रवास, निवासाची व्यवस्था या दृष्टीने अडचणीचे आहे. या पाच जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालक, सेवक यांचे अनेक खटले मुंबई उच्च न्यायालयात चालू आहेत. केसीसची भरमसाठ संख्या लक्षात घेता वेळेत निकाल होत नाहीत. कोल्हापुरात खंडपीठ झाले तर वेळेत निकाल लागतील तसेच शिक्षण क्षेत्रातील न्यायालयीन दाव्यांचा निपटारा जलद गतीने होऊन लोकांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. याप्रकरणी खंडपीठ कृती समिती व वकिल संघटनांच्या प्रयत्नांना
सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ एकमुखी पाठिंबा देत आहे. याप्रकरणी संबंधित यंत्रणेने तातडीने निर्णय घेऊन कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ तातडीने स्थापन करावे असा ठराव सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यकारिणी बैठकीत झाल्याचे संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात, खजिनदार रावसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अरुण दांडेकर,सचिव नितीन खाडीलकर, मुख्य प्रवक्ता विनोद पाटोळे, जॉइन्ट सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे व शिवपुत्र आरबोळे, शिवलिंग सुकरे व तुकाराम थोरात कराड, वैभव गुरव, चंद्रकांत हाक्के, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. एम. एस. रजपूत, अधिकराव हाक्के, राजेंद्र दुगाणे, स्मिता केळकर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.