छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुती सुझकी कंपनीस भाड्याने देणारे आयुक्तांच्या विरोधात भाजपा व खेळाडूंच्या वतीने निषेध आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम खेळाडूंचे नुकसान करून खेळ व खेळाडूंचे सराव बंद करून चुकीच्या पद्धतीने ,अवैध पद्धतीने मारुती सुझुकी नेक्सा या कंपनीस सांगली महापालिकेच्या आयुक्त नितीन कापडणीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भाड्याने दिले आहे. नॅशनल स्पर्धा जवळ आल्या आहेत. त्यामुळे कित्येक खेळाडूंचा या ठिकाणी सराव थांबलेला आहे त्यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस दीपक माने व ईम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली खेळाडू नी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सुझुकी नेक्सा च्या लोन एक्झिबिशन च्या समोर निषेध आंदोलनाला सुरुवात केली पण मुर्दाडपणे वअसंवेदनशीलपणे आयुक्त नितीन कापडणीस व त्यांचे इतर अधिकारी त्या ठिकाणी येऊन खेळाडूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून त्या कार लोन एक्झिबिशन चे उदघाटन केले. असा हिटलरशाही व्यक्तिमत्व असणारे आयुक्त नितीन कापडणीस सांगली शहरा नॅशनल स्पर्धा जवळ येत आहेत खेळाडूंच्या अडचणी निर्माण होत आहेत.
याचा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आयुक्त नितीन कापडणीस हे गाड्यांच्या कंपन्यांच्या बाजूने याठिकाणी निर्णय घेत आहेत अशा ह्या आयुक्तांचा हि आज खेळाडू च्या वतीने आयुक्तांच्यासमोरच निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी इमरान भाई शेख,सचिन ओमासे ,अमित भोसले प्रियानंद कांबळे ,राहुल माने ,रुषीकेश माने,व छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर सराव करणारे विविध खेळाडू याठिकाणी उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.