Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊत मित्र परिवाराने केला १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा – किरीट सोमय्या

 संजय राऊत मित्र परिवाराने केला १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा – किरीट सोमय्या


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला आहे. १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा संजय राऊत मित्र परिवाराने केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी कंत्राट मिळवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.

संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले. या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केले, २० कोटींचे दुसरे करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर, मी आज दुपारी ४ वाजता पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. खोटे डॉक्युमेंट्स देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळविले. कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.