Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सातबारा उतारा बंद होणार; भूमिअभिलेख विभागाचा निर्णय

 सातबारा उतारा बंद होणार; भूमिअभिलेख विभागाचा निर्णय


सातबारा उतारा रद्द करण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आला आहे. पण हा निर्णय फक्त वाढत्या शहरांसाठी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आता शहरात शेतजमिनीच शिल्लक राहिलेल्या नाहीत त्याठिकाणचा सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये सिटी सर्व्हे होऊन देखील सातबारा देणे हे सुरुच आहे. त्यामुळे अशा शहरांमध्ये सातबारा देण्याचे बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या नागरिकांना केवळ प्रॉपर्टी कार्ड देणे सुरु राहणार आहे. केवळ वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सारबाऱ्याचा उपयोग होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतलाअनेक शहरांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमीन शिल्लक नाही. अनेक शहरातील शेतजमीन जवळपास संपली आहे. त्यामुळे शहरांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातबाराचे रूपांतर प्रॉपर्टी कार्ड मध्ये झालेलं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणूकी सारखे प्रकार घडतात आणि म्हणूनच सर्व शहरातील सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.

सिटीसर्वे झाला पण सातबारा उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत त्यातून अनेक घोळ होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्याही वाढते या सर्व प्रकारांना रोखण्याचा हेतूनं शेतीचा वापर होत नसलेल्या जमिनीचा सातबारा कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमि अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. सिटी सर्वे सुरू झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक आहे तरी सुद्धा सातबाराचा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डचे दोन्ही अभिलेख सुरू आहेत. मात्र आता इथून पुढं शहरी भागामध्ये सातबारा उतारा बंद होऊन प्रॉपर्टी कार्ड सुरू केले जाणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.