महाभारतात भीमाची भूमिका साकारणाऱ्या प्रवीण कुमार यांचे 74 व्या वर्षी निधन
छोट्या पडद्यावरील 'महाभारत' या मालिकेने अनेक पिढ्यांचे मन जिंकून घेतले आहे. ही मालिका दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका आहे. बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार यांचे निधन झाले आहे.
अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. साडेसहा फूट उंचीचा अभिनेता आणि पंजाबच्या खेळाडूचे 74 व्या वर्षी निधन झाले. फील्ड स्पोर्ट्समधील यशस्वी कारकीर्दीनंतर, प्रवीणने 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रवीण कुमार यांनी एका मुलाखतीत संवाद साधताना सांगितले होते की, ते खूप दिवसांपासून घरी आहेत. तब्येत बरी नसते याशिवाय मणक्याची समस्या आहे. पत्नीने प्रवीणकुमारची काळजी घेतली. प्रवीण कुमार यांच्या एका मुलीचे मुंबईत लग्न झाले आहे.
वयाच्या 72 व्या वर्षी हालाखीचे जीवन जगत होते.
लॉकडाऊनमध्ये या सर्व मालिकांचे पुन:प्रसारण केल्यामुळे या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. मात्र, या कलाकारांची ओळख आजही कायम आहे. वयाच्या 72 व्या वर्षी प्रवीण कुमार सोबती आज अत्यंत हालाखीचे जीवन जगत होते. वयोमानानुसार, काम करु शकत नसल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.
दोन वेळा गोल्ड मेडल पटकावले.
अमृतसर पंजाबमध्ये जन्मलेल्या प्रवीण यांनी 1966 मध्ये कॉमन वेल्थ स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकले होते. त्यांनतर एशियन स्पर्धेत दोन वेळा गोल्ड मेडल पटकावले आहे. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी अॅथलीट्स प्रवीण हा हॅमर आणि डिस्कस थ्रो अॅथलीट होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने चार पदके (2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य) जिंकली होती. त्याने दोन ऑलिम्पिक गेम्समध्ये (1968 मेक्सिको गेम्स आणि 1972 म्युनिक गेम्स) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते अर्जुन पुरस्कार विजेतेही होते. खेळामुळे प्रवीण कुमार यांना सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) डेप्युटी कमांडंटची नोकरी मिळाली आहे. त्यांची पहिली भूमिका रविकांत नागाईच यांनी दिग्दर्शित केली होती ज्यात त्यांच्याकडे कोणतेही संवाद नव्हते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.