Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 चा विद्यार्थी जय तात्यासाहेब सौंदत्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती शासकीय परीक्षेत गुणवत्ता यादीत

महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 चा विद्यार्थी जय तात्यासाहेब सौंदत्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती शासकीय परीक्षेत गुणवत्ता यादीत


: आयएसओ शाळेच्या पटसंख्येतही वाढ: तर शिक्षक संघाकडून मनपा शाळेला आदर्श शाळेचा सन्मान : डिजिटल क्लासरूम आणि बोलक्या भिंतीमुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळां बनत आहेत हायटेक


सांगली: महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 चा विद्यार्थी जय तात्यासाहेब सौंदत्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती शासकीय परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या आयएसओ शाळेत यामुळे पटसंख्येतही वाढ होत आहे. तर शिक्षक संघाकडून मनपा 7 नंबर शाळेला आदर्श शाळेचा सन्मान देण्यात आला आहे. डिजिटल क्लासरूम आणि बोलक्या भिंती तसेच तज्ञ शिक्षक यामुळे शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली  महापालिका शाळां हायटेक बनत आहेत.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची मनपा शाळा क्र 7 सांगली ही शाळा स्फुर्ती चौक-धामणी रोड, विश्रामबाग, सांगली येथे बालवाडी पासून इ. 5 वी पर्यंतचे वर्ग व इ. 1 ली चे सेमी इंग्लीश वर्ग सुरु आहेत. या शाळेच्या पटामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. इ. 1 ली ते 5 वी बालवाडीची पटसंख्या 

 31 12 वरून 2021-22 124 98 वर पोहचली आहे. शाळेत पूर्व उच्च  प्राथमिक शिष्यवृत्ती शासकीय परीक्षा 2021 (इयत्ता 5 वी) मध्ये सांगली जिल्हा शहरी गुणवत्ता यादीत कु. जय तात्यासाहेब सौंदत्ते या विद्यार्थ्यास 120 वा क्रमांक मिळवून यश संपादन त्याला 214/300 टक्के 71.33 गुण मिळाले आहेत. महापालिका शाळा नंबर 7 ही ISO certified – 9001:2015 आहे. शाळेस महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघामार्फत सन 2019-20 सालासाठी आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

शाळेमध्ये सन 2019-20 मध्ये इ. 5 वी चा वर्ग नव्याने सुरु झाला आहे . शाळेमध्ये सन 2020-21 मध्ये इ. 1 ली सेमी इंग्लीश चा वर्ग नव्याने सुरु झाला आहे. प्रत्येक वर्गात विद्यार्थीनुरुप बोलक्या भिंती बनविलेल्या आहेत. डिजीटल क्लासरुम व ई लर्निंग द्वारे या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. शाळेत विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, केंद्रीय नवोदय विद्यालय परीक्षा व विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेतली जाते. प्रज्ञा परिक्षेत विद्यार्थ्यांनी शहर गुणवत्ता यादीत 10 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील शिक्षक प्रशिक्षित असून तसेच उच्च शिक्षण घेत आहेत. श्री सचिन भोसले हे शिक्षक सेट परिक्षा 2021 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. सौ. स्मिता सौंदत्ते यांना विविध संस्थेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.  ॲबॅकस स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. दरवर्षी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करुन लोकप्रतिनिधी, अधिकारी, पालक, शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत भव्यदिव्यपणे संपन्न केला जाते. शाळेतील सर्व शिक्षकांच्या मुलांचे शिक्षण याच शाळेत घेत आहेत. 

 शाळेचे सामाजिक कार्य सुद्धा चांगले आहे. शाळेने जिल्हास्तरीय मुल्यवर्धन मेळावामध्ये सहभाग घेतला होता. निवडणूक मतदार जनजागृती वोटर्स स्ट्रीट मध्ये सहभाग आकर्षक सेल्फी व सहभाग प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी मिळविले आहे.


स्वच्छ भारत अभियान जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेत सुपरहिरोच्या वेशभुषेत विद्यार्थ्यांनी मुख्य चौकामध्ये नागरिकांशी  संवाद साधून स्वच्छ सांगली सुंदर सांगली बाबत आवाहन केले आहे. स्वच्छ भारत अंतर्गत प्लॅस्टीक मुक्ती जनजागृती अभियानातंर्गत विद्यार्थ्यांनी घरातील व परीसरातील प्लॅस्टिक गोळा करुन आरोग्य विभागास सुपुर्द केले आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोरोना 19 साठी कोरोना रुग्ण सर्व्हेक्षणात शिक्षकांची उल्लेखनीय कामगिरी  तसेच सर्व शिक्षक कोरोना लसीकरणासाठी मनपा आरोग्य केंद्रावर व वॉर रुममध्ये कामकाज केलेले आहेत. महापूरावेळी पुरग्रस्त नागरिकांसाठी निवारा केंद्र शाळेमध्ये सुरु ठेवले जाते. पुरग्रस्त नागरिकांसाठी आवश्यक सुविधा शाळेमार्फत उपलब्ध करुन दिल्या जातात. शाळेने विविध क्षेत्रात व राजयस्तरावर महानगरपालिकेचे नांव उंचावले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळांना उभारी आहे. त्यामुळे महापालिका शाळांकडे विद्यार्थी संख्या वाढत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.