Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रात मनपाच्या 50 तर खासगी 248 शाळा सुरू : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानंतर कोविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु

महापालिका क्षेत्रात मनपाच्या 50 तर खासगी 248 शाळा सुरू : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानंतर कोविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु


सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात गुरुवार  3 फेब्रुवारीपासून मनपाच्या 50 तर खासगी 248 आशा 298 शाळा सुरू झाल्या आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळा सुरू करण्याबाबतचे  आदेश काढले आहेत. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करीत मनपाक्षेत्रात शाळा सुरु झाल्या आहेत. 

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने मनपाक्षेत्रातील मनपाच्या आणि खासगी शाळा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. कोविड रुग्णसंख्या घटल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे मनपा क्षेत्रातील शाळा सुरू होण्याच्या मार्ग मोकळा झाला होता. शासन आदेशानुसार आता मनपाक्षेत्रातील खासगी आणि मनपाच्या सर्व प्राथमिक शाळा 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा शिक्षण विभागाला दिले होते. यानुसार शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे यांनी मनपाक्षेत्रात असणाऱ्या खासगी 248 आणि महापालिकेच्या 50 आशा 298 शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली होती. शाळा सुरू करत असताना कोविड नियमांचे पालन करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. मनपाक्षेत्रात 5511 मनपा शाळेचे तर 103628 इतकी खासगी शाळांची विद्यार्थी संख्या आहे. महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची तपासणी करून, हात सॅनिटाईज करून वर्गात प्रवेश दिला जात आहे. तसेच वर्गातही एक बेंच वर एक असे विद्यार्थ्यांना बसवले जात आहे. उत्साही वातावरणात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात शाळा सुरू  झाल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.