महापालिका क्षेत्रात मनपाच्या 50 तर खासगी 248 शाळा उद्यापासून सुरू होणार : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आदेश: कोविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु होणार
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात गुरुवार 3 फेब्रुवारीपासून मनपाच्या 50 तर खासगी 248 शाळा सुरू होणार आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे कोविड नियमांचे पालन करीत मनपाक्षेत्रात शाळा सुरु होणार आहेत. या दृष्टीने प्राथमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने मनपाक्षेत्रातील मनपाच्या आणि खासगी शाळा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. कोविड रुग्णसंख्या घटल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे मनपाक्षेत्रातील शाळा सुरू होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. शासन आदेशानुसार आता मनपाक्षेत्रातील खासगी आणि मनपाच्या सर्व प्राथमिक शाळा गुरुवार 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा शिक्षण विभागाला दिले आहेत. यानुसार शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे यांनी मनपाक्षेत्रात असणाऱ्या खासगी 248 आणि महापालिकेच्या 50 आशा 298 शाळा सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. तसेच शाळा सुरू करत असताना कोविड नियमांचे पालन करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. मनपाक्षेत्रात 5511 मनपा शाळेचे तर 103628 इतकी खासगी शाळांची विद्यार्थी संख्या आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.