Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेकडून 30 विहिरींची स्वच्छता

 माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेकडून 30 विहिरींची स्वच्छता


सांगली : माझी वसुंधरा अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विहिरी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. 


या विहीर स्वच्छता मोहिमेत मनपाक्षेत्रातील 30 विहिरींची स्वच्छता करण्यात आली. मनपा आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यानी अग्निशमन विभागाच्या सुरक्षा साधनांच्या साहायाने विहिरीत उतरून स्वच्छता केली. मनपा उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, व स्व निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्या टीमकडून 30 विहिरी स्वच्छ करण्यात आल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.