सांगली महापालिकेकडून सांगली मिरजेच्या मुख्य मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम : मनपा कर्मचारी सामाजिक संस्था, स्वच्छता दूतांनी घेतला सहभाग: मोहिमेत 25 टन कचरा संकलित
सांगली :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण, माझी वसुंधरा आणि आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत तसेच महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधत मंगळवारी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम घेणेत आली. या मोहिमेत एकूण 25 टन कचरा संकलित झाला आहे.
या अंतर्गत सांगलीतील राममंदिर कॉर्नर पासून ते संपूर्ण सांगली मिरज रस्ता आणि पंढरपूर रोड स्मशान भूमीपर्यंतच्या मुख्य मार्गाची स्वच्छता करण्यात आली. मनपा अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे , उपायुक्त चंद्रकांत यांच्या नियंत्रणाखाली ही विशेष स्वच्छता मोहित घेणेत आली. यामध्ये महापालिका आरोग्य कर्मचारी तसेच सामाजिक संस्था आणि वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या मोहिमेंतर्गत मुख्य मार्गाची स्वच्छता करण्यात आली. याचबरोबर मुख्य मार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या साईड पट्ट्या, डिव्हायडर आणि आयलँड व पुतळेसुद्धा स्वच्छ करण्यात आले. या विशेष स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे स्वच्छता दूत प्रसिद्ध हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी आणि डॉ दिलीप पटवर्धन यांनीही सहभागी होत स्वच्छता केली. याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
सातत्याने आशा मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत. या विशेष स्वच्छता मोहिमेत राममंदिर पासून ते मिरज पंढरपूर स्मशानभूमीपर्यंत सर्व मार्ग स्वच्छ करण्यात आला. या मार्गावरील गाजगावत, राडारोडा, प्लास्टिक, तसेच अन्य कचरा , दगड धोंडे , राडारोडा मनपाकडून उचलण्यात आला. तसेच या संपूर्ण मार्ग स्वच्छ करण्यात आला.
तसेच संकलित कचरा तातडीने मनपाच्या कचरा गाडीतून उचलून डेपोमध्ये पाठवण्यात आला. याच बरोबर स्वच्छ झालेल्या मार्गावर औषध फवारणीही करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत मनपाचे वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अनिल पाटील, बंडा जोशी, याकूब मद्रासी, युनूस बारगिर यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत होती. याचसह वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या 50 विद्यार्थ्यांनी सुद्धा या विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागी होत शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान दिले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून झालेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील मुख्य मार्ग चकाचक झाला आहे. या मोहिमेबाबत सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.