कोव्हिडं 19 आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 50 हजाराचे शासनाचे सानुग्रह अनुदान लाभ देण्याकामी नियुक्त तक्रार निवारण समिती बैठकीत 15 अपिलांना मंजुरी : 5 अपील अपात्र : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न
सांगली: कोव्हिडं 19 आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 50 हजाराचे शासनाचे सानुग्रह अनुदान लाभ देण्याकामी नियुक्त तक्रार निवारण समितीची अपात्र लाभार्थी अपील सुनावणीची पहिली बैठक महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अपील सुनावणी संपन्न झाली.
या अपील 63 अपीलकर्त्याना बोलावण्यात आले होते. यापैकी 32 अपीलधारक हे प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर होते. यावेळी सांगली समिती अध्यक्ष तथा उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत कागदपत्र पूर्तता केलेली 15 अपील मंजूर करण्यात आले तर कोणतीही कागदपत्र किंवा अपूर्ण कागदपत्रे असल्याने 5 अपील नामंजूर करण्यात आले. याचबरोबर कागदपत्र अपूर्ण असलेल्या 12 अपीलधारकांना आपल्या कागदपत्र पूर्ततेसाठी 6 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या अपील सुनावणीस उपायुक्त चंद्रकांत आडके समिती सदस्य डॉ. विजय ऐनापुरे, सिव्हिल हॉस्पिटलचे प्रतिनिधी डॉ. नौशाद मुजावर, मनपा आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, मनपा संगणक सहायक अनिल वाघमारे आणि वरून जाधव आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.