जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणांत त्रुटी पुर्तता करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत
सांगली, दि. 2, : जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली कार्यालयात ज्या अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर केले आहेत, परंतू त्यांचे प्रकरण समितीकडे अपूर्ण कागदपत्रे, त्रुटी पुर्तते अभावी प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांना त्यांनी अर्जावर नमुद केलेल्या ई-मेलवर कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता समितीकडून कळविण्यात आले आहे. तरी देखील अर्जदारांनी त्यांच्या प्रकरणात आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांची प्रकरणे निर्णया अभावी प्रलंबित आहेत. समितीकडील अशा ऑनलाईन व ऑफलाईन प्रलंबित प्रकरणात कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. तरी प्रकरण प्रलंबित असणाऱ्या अर्जदारांनी मुदतीत त्रुटी पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदीनी आवडे यांनी केले आहे.
ज्या अर्जदारांकडून दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत कागदपत्रांची पुर्तता केली जाणार नाही अशा अर्जदारांची प्रकरणे त्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता नाही, असे गृहीत धरून गुणवत्तेनुसार बंद करण्याची कार्यवाही समिती स्तरावरून करण्यात येईल. त्यानंतर ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्यांनी नव्याने ऑनलाईन अर्ज भरून आपल्या जातीदाव्यापृठ्यर्थ आवश्यक पुराव्यांसह अर्ज समिती कार्यालयात सादर करावा लागेल याची नोंद घ्यावी, असे श्रीमती आवडे यांनी स्पष्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.