Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Ratıon Card वर डीलर कमी धान्य देतोय? या नंबरवर लगेच करा तक्रार

 Ratıon Card वर डीलर कमी धान्य देतोय? या नंबरवर लगेच करा तक्रार


नवी दिल्ली, 28 जानेवारी : रेशन कार्ड एक असं डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे स्वस्त दरात धान्य उपलब्ध होतं. परंतु अनेकदा डीलर रेशन कार्डधारकांना धान्य देताना कमी धान्य देतात किंवा त्यात काही फसवणूकही करतात.

अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तुमच्याही ही बाब लक्षात आली असल्यास तुम्ही याबाबत तक्रार करू शकतात. सरकारकडून प्रत्येक राज्यानुसार, हेल्पलाइन नंबर  जारी करण्यात आले आहेत. जर तुम्हालाही रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल, तर डीलर विरोधात तक्रार दाखल करू शकता. सरकार भष्ट्राचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत, जेणेकरुन योग्य लोकांपर्यंत धान्य पोहोचू शकेल. कोणत्याही रेशन कार्डधारकाला आपल्या वाट्याचं धान्य मिळत नसेल, तर ते टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर  कॉल करुन तक्रार करू शकतात.

तुमच्या राज्याचा टोल फ्री नंबर नॅशनल फूड सिक्योरिटी पोर्टलच्या https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर क्लिक करुन मिळवू शकता. रेशन कार्डसाठी अप्लाय केल्यानंतरही अनेकांनी अनेक महिन्यांपर्यंत रेशन कार्ड मिळत नाही. अशात याबाबतही इथे तक्रार करू शकता. महाराष्ट्रासाठी 1800-22-4950 हा टोल फ्री हेल्पलाइन नंबर  आहे.कसं बनवाल तुमचं रेशन कार्ड - सर्वात आधी राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रुफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स अशी कागदपत्र लागतील. रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासह सोबत 5 ते 45 रुपयांपर्यंत फी द्यावी लागेल. अर्ज सबमिट झाल्यानंतर तो फिल्ड वेरिफिकेशनसाठी पाठवला जातो. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून यात भरलेल्या माहितीची चौकशी केली जाते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.