Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Online Driving Licenseसाठी कसा करायचा अर्ज? माहीत नसेल तर जाणून घ्या सोपी प्रोसेस

 Online Driving Licenseसाठी कसा करायचा अर्ज? माहीत नसेल तर जाणून घ्या सोपी प्रोसेस


नवी दिल्ली, 03 : रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना  हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहने चालवली तर तुमचे चलन कधीही कापले जाऊ शकते.याशिवाय अपघात झाल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Online Driving License) असणे आवश्यक आहे. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल किंवा तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असल्यास आता ऑनलाईन लायसन्स काढण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला कोरोना महामारीमुळे किंवा इतर कामांमुळे आरटीओ कार्यालयात जायचे नसेल, तर तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

यासाठी तुम्ही संपूर्ण प्रक्रिया घरी बसून करू शकता. ऑनलाईन पद्धतीने मुदत संपलेली लायसन्स रिनीव्ह करता येते, तसेच नवीन लायसन्स हवी असल्यास कच्ची लायसन्स घरबसल्या मिळते, त्याबद्दल जाणून घेऊया. 

Step 1: ड्रायव्हिंग लायसन्सला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला परिवहन विभागाच्या वेबसाइटवर क्लिक करावे लागेल. https://parivahan.gov.in/ 

Step 2: यानंतर तुम्हाला ऑनलाइन सर्व्हिसवर क्लिक करावे लागेल आणि नंतर होम पेजवर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवांवर जावे लागेल.

Step 3: यानंतर तुमच्या समोर एक वेगळे पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव निवडायचे आहे. Step 4: राज्य निवडल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल. यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. जिथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Step 5: ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्ज सबमिट करण्याचा पर्याय येईल. 

Step 6: याआधी तुम्हाला संपूर्ण अर्ज भरावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला जे काही तपशील विचारले जातात ते भरा. हे WhatsAppचा युजर्सना मोठा झटका!

Step 7: यासह, अपलोड करण्यासाठी जे काही दस्तऐवज विचारले जातात ते तुम्ही अपलोड करा. 

Step 8: ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला फोटो अपलोड करावा लागेल आणि सही अपलोड करावी लागेल. हे Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच 

Step 9: यानंतर फी जमा करण्याचा पर्याय येईल. ज्यामध्ये तुम्हाला विहित शुल्क जमा करावे लागेल. 

Step 10: या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पावती डाउनलोड करा आणि प्रिंट करा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.