Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकाच व्यक्तीला कितीवेळा Omicron ची लागण होऊ शकते..

 एकाच व्यक्तीला कितीवेळा Omicron ची लागण होऊ शकते..


नवी दिल्ली, 24 जानेवारी: देशात कोरोनाचे  रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दररोज समोर येणाऱ्या प्रकरणांची संख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमागील कारण म्हणजे कोरोनाव्हायरसचा ओमिक्रॉन प्रकार.

कोरोना विषाणूचा हा प्रकार संसर्ग पसरवण्याच्या बाबतीत घातक आहे. तो कोरोनाच्या डेल्टा प्रकारापेक्षा अधिक वेगाने या प्रकारामुळे रुग्ण बाधित होतात. जगातील विविध देशांमध्ये या प्रकाराने आतापर्यंत सर्वाधिक कहर केला आहे. ओमिक्रॉन प्रकारातील सर्वात मोठी समस्या ही आहे की हा प्रकार ऍन्टीबॉडीजला जुमानत नाही.

त्या अँटीबॉडीज लसीकरणामुळे तयार झालेल्या असोत किंवा जुन्या कोरोना संसर्गामुळे  बनल्या असोत. याची लागण पुन्हा होऊ शकते. एकच व्यक्ती किती वेळा संक्रमित होऊ शकते झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एकाच व्यक्तीला दोनदा कोरोना संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. अशी अनेक प्रकरणे होती ज्यात एकाच व्यक्तीला दोनदा डेल्टा संसर्ग झाला होता.

त्यामुळे आताही असा प्रश्न विचारला जात आहे, की ओमिक्रॉन प्रकार एखाद्या व्यक्तीला किती वेळा संक्रमित करू शकतो. अहवालानुसार, Omicron मध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा प्रकारापेक्षा 4 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत एकाच व्यक्तीला 2 वेळा Omicron चा संसर्ग होण्याची शक्यता सहज निर्माण होते. हे ही आहेत Omicron ची सर्व 14 लक्षणं; सर्वात कमी आणि सर्वात जास्त वेळा दिसलेले Symptoms आपल्या शरीरात अँटीबॉडीज असतानाही ओमिक्रॉनची लागण  होऊ शकते.

त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा त्यांना आधीच कोरोना किंवा ओमिक्रॉनची लागण झाली आहे, अशा लोकांनाही सहज संसर्ग होत आहे. 

हे Immunity Booster for Omicron : हे आयुर्वेदिक पदार्थ वाढवतील Immunity, ठरू शकतात फायद्याचे ओमिक्रॉनपासून संरक्षण करण्याचा उपाय सरकारने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीनुसार, ओमिक्रॉन टाळण्यासाठी महत्त्वाच्या कामांसाठीच घराबाहेर पडावे. बाहेर पडताना डबल मास्क वापरा. हात वारंवार स्वच्छ करावेत. अन्न खाण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुवा. आपले डोळे, तोंड किंवा चेहऱ्याला बाहेर असताना हात स्वच्छ केल्याशिवाय स्पर्श करू नका.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.