Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LIC ची 'जीवन लाभ पॉलिसी'; दररोज फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख

 LIC ची 'जीवन लाभ पॉलिसी'; दररोज फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख


पुन्हा एकदा संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे.यामुळे गुंतवणूकदार कमी जोखीम असलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. त्यासोबतच लोकांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायची आहे, ज्यात त्यांना चांगला परतावा मिळू शकेल. अशा परिस्थितीत तुम्ही एलआयसीच्या एंडोमेंट प्लान 'जीवन लाभ पॉलिसी' (Jeevan Labh Policy) मध्ये गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीमध्ये थोड्या गुंतवणुकीसह, तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी मोठी रक्कम जमा करू शकता.

फक्त दररोज 260 रुपयांची गुंतवणूक

एलआयसी  च्या वेबसाईटवर उपलब्ध कॅलक्युलेटरनुसार, LIC Jeevan Labh Policy मध्ये दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीसह, तुम्हाला मॅच्युरिटीवर 20 लाख रुपये मिळू शकतात. तुम्ही या योजनेत किमान 2 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकता. मात्र, यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकरातही सूट मिळते.

पॉलिसी टर्म

एलआयसीची ही पॉलिसी तीन टर्ममध्ये येते. तुम्ही 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्ष यांपैकी एक मॅच्युरिटी कालावधी निश्चित करुन या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकता. प्रीमियम भरण्याची मुदत 10 वर्षे, 15 वर्षे आणि 16 वर्षे आहे. या योजनेत गुंतवणुकीचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.

गुंतवणूक करण्यासाठी वय

आठ ते 59 वर्षे वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकते. तथापि, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरल्यास, तुम्हाला उशीरा पेमेंटसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. तुम्ही त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, विमा रकमेइतकी रक्कम नॉमिनीला दिली जाते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.