Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वेळेआधी FD न तोडता मिळणार बंपर रिटर्न! 'ही' टेक्निक वापरून करा कमाई

 वेळेआधी FD न तोडता मिळणार बंपर रिटर्न! 'ही' टेक्निक वापरून करा कमाई


नवी दिल्ली: FD ही अशी गुंतवणूक आहे. ज्यामध्ये तुम्हाला निश्चित ठराविक परतावा मिळतो. बचतीसाठी एफडीला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. बँका विशिष्ट कालावधीसाठी वेगवेगळ्या व्याजावर FD चा पर्याय देतात.

ठराविक कालावधीनंतर ही रक्कम तुमच्या खात्यात व्याजाच्या स्वरूपात जमा होत राहते. पण काही कारणास्तव तुम्ही वेळेपूर्वीच FD तोडली तर तुम्हाला त्यावर दंड भरावा लागेल आणि तुमचा परतावा कमी होईल.

FD लॅडरिंग तंत्रज्ञान हा एक उत्तम पर्याय

SBI आपल्या ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या FD मुदतपूर्वीच काढल्यास अर्धा टक्के दंड आकारते.

जर तुम्ही 5 लाख रुपयांची एफडी 5 वर्षांसाठी करीत असाल तर ती वेगवेगळ्या मुदतीसाठी केलेली योग्य ठरू शकते.

म्हणजेच...

या पाच एफडींचा मॅच्युरिटी कालावधीही वेगळा असेल.

आता तुम्ही त्यांना एक, दोन, तीन, चार आणि पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनुसार निश्चित करा.

अशा प्रकारे गुंतवणूक केल्यास तुमच्याकडे पुरेशी लिक्विडिटी असेल.

या टेक्निकला 'फिक्स डिपॉझिट लॅडरिंग' म्हणतात.

आता वेगवेगळ्या मॅच्युरिटी असलेल्या एफडी तुम्हाला गरज असेल तेव्हा काढू शकता किंवा गरज नसेल तर रिन्यू करू शकता.

सेवानिवृत्त लोकांसाठी उत्तम पर्याय

निवृत्त लोकांसाठी फिक्स डिपॉझिट लॅडरिंग करण्याचे तंत्र खूप प्रभावी आहे. यामुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळते आणि त्यांना रोख रकमेची कोणतीही अडचण येत नाही.

यामुळे अनेक पर्यायही उपलब्ध होतात. पहिल्या एफडीच्या मॅच्युरिटीनंतर, जर तुम्हाला वाटत असेल की यापेक्षा जास्त नफा इतर गुंतवणुकीत आहे, तर तुम्ही तुमचे पैसे तिथेही गुंतवू शकता. म्हणजेच तुम्हाला गुंतवणूकीत अडकून राहण्याची गरज नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.