ओमायक्रॉनचा पुढील प्रकार अधिक घातक
नवी दिल्ली : ओमिक्रॉन आता जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. कोरोनाच्या जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन धोकादायक आढळून आला नसला तरी, ओमिक्रॉनला सौम्य मानणं ही एक मोठी चूक ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ज्ञाने यांसदर्भातील दावा केला आहे.
केंब्रिज युनिवर्सिटीमधील प्रमुख भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांनी हा इशारा दिला आहे. डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्याप्रमाणे, ओमिक्रॉनची Omicron कमी तीव्रता ही सध्या एक चांगली बातमी आहे. मात्र आता असं दिसतंय की याचा पुढील व्हेरिएंट अधिक धोकादायक असू शकतो. केंब्रिज इन्स्टिट्यूट फॉर थेरप्यूटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजेस (CITIID) मधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक रवींद्र गुप्ता यांनी नुकतंच ओमिक्रॉन व्हेरिएंटसंदर्भात अभ्यास केला. डॉ. गुप्ता यांनी केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, नवीन व्हेरिएंट फुफ्फुसांमध्ये आढळणाऱ्या पेशींना कमी प्रमाणात संक्रमित करतो.
डॉ. गुप्ता पुढे म्हणाले, ओमिक्रॉन Omicron जास्त घातक असल्याचं लक्षात आल्यानंतर, लोकांचा असा विश्वास निर्माण झाला आहे की व्हायरस कालांतराने कमकुवत होतो आहे. परंतु कोरोनाच्या बाबतीत असं नाही, तो काळानुसार सतत नव्या बदलांसह समोर येईल. SARS-CoV-2 ला हलक्यात घेणं धोकादायक ठरू शकतं. कारण लसीकरण झाल्यानंतरही त्याचा संसर्ग खूप वेगाने पसरतोय, असंही डॉ. गुप्ता म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.