Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"चारेक संघविचारी माझ्या विरोधात, पण मी कच्च्या गुरूचा चेला नाय" किरण मानेंची पोस्ट व्हायरल

 "चारेक संघविचारी माझ्या विरोधात, पण मी कच्च्या गुरूचा चेला नाय" किरण मानेंची पोस्ट व्हायरल


स्टार प्रवाह वरील "मुलगी झाली हो" मालिका चांगलीच वादात सापडली आहे, या मालिकेत प्रमुख भुमिकेत असणारे अभिनेते किरण माने यांनी मालिकेतून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

किरण माने फेसबुकवर वेगवेगळया विषयांवर लिखाण करत असतात, तसेच यासोबत ते अनेक वेळा राजकिय भूमिका घेऊन देखील आपली मते रोखठोकपणे मांडत असतात.

याच पार्श्वभूमीवर राजकीय भुमिका घेतल्याने किरण मानेंना मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सोशल मीडियावर लोकांनी स्टार प्रवाह मालिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. यासोबत किरण मानेंनी आज सकाळी केलेली फेसबूक पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरत आहे.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट

आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..

आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत.अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे. चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच !

पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा !

मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !

तुका म्हणे रणी.नये पाहो परतोनी !!! - किरण माने.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.