Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसतर्फे प्रभात फेरी

गांधी पुण्यतिथीनिमित्त  काँग्रेसतर्फे प्रभात फेरी


सांगली, दि. ३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभात फेरी काढण्यात आली. 

काँग्रेस भवनपासून ही फेरी सुरू करण्यात आली. स्टेशन चौकात  आल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामूहिक प्रार्थना म्हणण्यात आली.  सांप्रदायिक सदभावनेची शपथही देण्यात आली.

 महात्मा गांधींना अभिवादनपर भजनाचा कार्यक्रम दादा मुळे, भोरे चाचा, दीपक शेलार यांनी सादर केला. 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, अजित ढोले, देशभूषण पाटील, अकबर मोमिन, रवींद्र खराडे, मालन मोहिते, अमर निंबाळकर, बाबगोंडा पाटील, अशोकसिंह राजपूत, प्रशांत देशमुख, अशोक रासकर,अँड भाऊसाहेब पवार, अनिल सुगाण्णावर, धनराज सातपुते, योगेश जाधव, मनोज लांडगे, अमोल पाटील, श्रीनाथ देवकर, विक्रम कांबळे, अमित पारेकर, पैगंबर शेख, मौलाली वंटमुरे, नाना घोरपडे, अरुण पळसुले, याकूब मनेर, अल्ताफ पेंढारी, राम परदेशी, राजेंद्र कांबळे, प्रशांत अहिवळे, अशोक चौधरी, अक्षय दुगे, सागर काळे, अल्बर्ट सावर्डेकर, आदिराज पाटील, श्रीधर बारटक्के, शैलेंद्र पिराळे, विठ्ठल काळे, रजिया शेख, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, विश्वास यादव, नामदेव पठाडे, नामदेव चव्हाण, आरिफ मुजावर, रामचंद्र पवार, उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.