Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता, महापौरांनी दिले स्पष्ट संकेत

मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता, महापौरांनी दिले स्पष्ट संकेत


 

मुंबईत दररोज 20 हजारांपेक्षा जास्त कोव्हिड रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लावावा लागेल असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये मंगळवारी (4 जानेवारी) 10,860 नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत ओमिक्रॅानच्या आकड्यांचा स्फोट झालाय. गेले काही दिवस दररोज शहरात 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा कोरोना लॉकडाऊनची चर्चा सुरू झालीय.

लॉकडाऊनबाबत बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "केंद्राच्या नियमांनुसार रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा जास्त झाली. तर लॉकडाऊन करावा लागेल."

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजार पार

पुण्यात आता मास्क घातला नाही तर होणार 'ही' कारवाई

ओमिक्रॉन म्हणजे 'नॅचरल व्हॅक्सीन' या दाव्यात तथ्य आहे का?

कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी पॅाझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या वर गेल्यास कडक निर्बंध लागू करा, अशी सूचना केंद्राने केली होती.

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती काय?

ओमिक्रॅानची तिसरी लाट मुंबईत झपाट्याने पसरतेय. मुंबईत सद्यस्थितीत अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 37 हजारावर पोहोचलीय.

मुंबईत महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत 4 जानेवारीला 10,606 नवीन रुग्ण आढळून आले. यापैकी 834 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. यापैकी 52 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत.

3 जानेवारीला 8082 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 7273 एसिम्टोमॅटिक होते. सोमवारी 573 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. रविवारच्या तुलनेत हा आकडा 15 टक्क्यांनी वाढला.

मुंबईत सद्यस्थितीत 127 रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय. मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 138 दिवसांपर्यंत खाली आलाय.

दिवसेंदिवस वाढणार्या कोरोनासंसर्काने सरकार आणि मुंबई महापालिकेची चिंता वाढलली आहे.लॉकडाऊनबाबत महापौर काय म्हणाल्या?केंद्राने कोरोना संसर्गाची उपाययोजना म्हणून टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल त्या जिल्ह्यात निर्बंध कडक करण्याची सूचना केली होती.ओमिक्रॅानच्या झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय आहे? हा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आला.

यावर बोलताना त्या म्हणाल्या, "लॉकडाऊन कोणालाच नकोय. पण लोकांनी मास्क घातला पाहिजे, गर्दी करू नये आणि लस लवकरात लवकर घ्यावी. लोकांनी काळजी घेतली तर लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार नाही."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.