Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

थोडे जाणून घ्या, तापाची गोळी डोलो ६५० विषयी

 थोडे जाणून घ्या, तापाची गोळी डोलो ६५० विषयी


गेली दोन वर्षे करोना आणि त्याच्या नवनव्या व्हेरीयंट संसर्गामुळे लोकांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अश्या लक्षणांनी बेजार केले आहे पण करोनावर अजून रामबाण औषध मिळालेले नाही. यामुळे वरील प्रकारे जाणविणाऱ्या सर्व लक्षणांसाठी उपयुक्त ठरलेल्या डोलो ६५० या गोळ्या डॉक्टर देत आहेत.

गेल्या दीड दोन वर्षाच्या काळात डोलो ६५० चा खप प्रचंड वाढला आहे आणि आता तर डॉक्टरचा सल्ला न घेताच नागरिक डोलो ६५० औषध सर्रास विकत आणून घेत असल्याचे दिसून आले आहे. लसीकरण सुरु झाल्यावर सुद्धा लस घेतल्यानंतर ताप आला तर याच गोळ्या दिल्या गेल्या आहेत. पण डॉक्टरना न विचारता परस्पर अश्या गोळ्या घेणे घातक असून अन्य इतर औषधांप्रमाणे डोलो ६५० चेही काही दुष्परिणाम आहेत.

डोलो ६५० मध्ये पॅरासीटामॉल आहे ज्याचा उपयोग ताप कमी करण्यासाठी होतो. करोना काळात ताप हे प्रमुख लक्षण असल्याने डोलो ६५० गोळ्या सर्रास घेतल्या गेल्याचे आढळले आहे. ताप, डोकेदुखी, दातदुखी, पाठदुखी, नस वेदना, स्नायूदुखी यासाठी या गोळ्यांचा वापर केला गेला असल्याचे दिसून आले आहे. या गोळीमुळे मेंदूकडे जाणारे वेदना संदेश कमी होतात आणि वेदनेतून आराम मिळतो. हे औषध शरीरात रिलीज होणारे प्रोस्टेग्लॅडीन्स हे रसायन थांबविते कारण हे रसायन वेदना वाढविणारे, ताप आणणारे आहे.

गोळी घेतल्यास अनेकदा जीव घाबरा होणे, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे, अशक्तपण जाणवणे, गुंगी येणे, अस्वस्थता, बद्धकोष्ठता, क्वचित बेशुद्धी, तोंड कोरडे पडणे, युरीन मार्गात संसर्ग, छातीचे ठोके मंदावणे, स्वरयंत्राला सूज, फुफ्फुस संसर्ग असे त्रास होऊ शकतात. कधी कधी मज्जा संस्थेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या गोळ्या बाजारात सहज उपलब्ध असल्या तरी डॉक्टर सल्ल्याशिवाय त्या घेऊ नयेत असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी सांगली दर्पण घेत नाही


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.