कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी सतर्क राहा: मनपा क्षेत्रात नियम तोडणाऱ्यावर कारवाई करा: रुग्ण वाढलेच तर वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे प्रशासनाला आदेश : उद्यापासून कोरोना नियम तोडणाऱ्यावर महापालिका कारवाई करणारमहापालिका क्षेत्रात प्रदर्शने, मेळावे, स्पर्धा, खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नका: आयुक्त नितीन कापडणीस यांचे प्रशासनाला आदेश
सांगली मिरज आणि कुपवाड शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी सतर्क राहा अशा सूचना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत. याचबरोबर मनपाक्षेत्रात कोरोनाचे नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई करावी आणि
प्रदर्शने, मेळावे, स्पर्धा, खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नका असे आदेशही आयुक्त कापडणीस यांनी दिले आहेत.
कोरोना आणि ओमयक्रोनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कापडणीस यांनी आपल्या वैद्यकीय यंत्रणेला अलर्ट केले आहे. अन्य जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात रुग्ण सापडण्याचे प्रमाण सध्या तरी कमी असले तर रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यापुढे रुग्ण वाढलेच तर त्यांच्यावर उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा असे आदेशही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता प्रदर्शने, मेळावे, स्पर्धा, खुल्या मैदानांवरील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊ नका असेही आदेश कापडणीस यांनी दिले आहेत. याचबरोबर उद्यापासून कोरोना नियम तोडणाऱ्यावर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना पसरू नये यासाठी दक्ष राहा असे सांगत नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं , मास्क वापरावे असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.