Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्था सभासदांच्या विश्वासास खरी उतरेल संभासदांच्या विश्वासाच्या बळावर कर्मवीर पतसंस्थेची भरारी :- रावसाहेब जिनगोंडा पाटील सलगरे शाखा प्रथम वर्धापनदिनी उद्गार

कर्मवीर पतसंस्था सभासदांच्या विश्वासास खरी उतरेल संभासदांच्या विश्वासाच्या बळावर कर्मवीर पतसंस्थेची भरारी :- रावसाहेब जिनगोंडा पाटील सलगरे शाखा प्रथम वर्धापनदिनी उद्गार


सलगरे :- नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.. सांगली च्या सलगरे शाखेचा पहिला वर्धापन दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील बोलत होते.

स्वागत प्रास्ताविक श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या अर्थकारण प्रगती तंत्रज्ञान ग्राहकसेवा समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी संस्थेच्या सांपत्तीक स्थितीची माहिती दिली. संस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून संस्थेच्या ५१ शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या ठेवी ६३० कोटी असून कर्ज वाटप रु. ४७२ कोटी, भागभांडवल २३ कोटी ८० लाख आहे. स्वनिधी रु. ५७ कोटी ४४ लाख गुंतवणुक २०० कोटी १० लाख आहे. संस्थेचे खेळते भांडवल ७२६ कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय १५०० कोटी कडे वाटचाल करीत आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे चे श्री रविंद्र नंदकुमार अथणे होते. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून संस्थेने सभासदांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केल्याचे त्यांनी नमुद केले...

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सांगली च्या सदस्या सौ. जयश्रीताई तानाजीराव पाटील, पंचायत समिती

मिरजच्या सदस्या सौ. सुवर्णाताई बाळासो कोरे, सलगरे चे सरपंच .तानाजीराव महादेव पाटील, उपसरपंच

श्री. सुरेश आप्पा कोळेकर (बापू) सलगरे विकास सोसायटीचे चेअरमन श्री. नाथाजी रावजी पाटील शेतकरी विकास सोसायटीचे चेअरमन श्री. नारायण श्रीमंत जाधव हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते. संस्थेने ग्राहक सेवेला अग्रक्रम दिला असून त्यामध्ये संस्था कधीही कमी पडणार नाही असे आश्वासन चेअरमन या नात्याने श्री. पाटील यांनी दिले. कर्मवीर पतसंस्था उत्तम व्यवस्थापनास अतिशय महत्व देते त्यामुळे संस्थेचे कामकाज अतिशय उत्तम चालले असून ही संस्था पतसंस्था क्षेत्रात दिपस्तंभाचे कार्य करेल असा विश्वास त्यांनी सभासदांना दिला.


या प्रसंगी सरपंच श्री. तानाजीराव पाटील उपसरपंच श्री. सुरेश कोळेकर, संतोषवाडीचे सरपंच हणमंतराव गायकवाड, श्री. शिवाजीराव माळकर यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

कार्यक्रमास प.स. मिरज चे माजी सभापती खंडेराव जगताप, मार्केट कमिटी मिरज चे सभापती वसंतराव गायकवाड बेळंकीचे सरपंच राजाराम गायकवाड शिक्षण समिती सलगरे चे अध्यक्ष रमेश राजगे विकास सोसायटीचे माजी चेअरमन वसंत बिसुरे. आरपीआय सलगरे चे अध्यक्ष अनिल कांबळे वेळकी सोसायटीचे संस्थापक चेअरमन संजय पवार डोंगरवाडीचे पोलीस पाटील श्रीकांत चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोष्टी, सौ. सुलभाताई निकम, क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष विजयराव शिंदे, मंगोबा दुध संस्थेचे चेअरमन विद्यानंद बिसुरे, सुनिल अभंगराव पिंटू निबाळकर सरकार अक्षय गुंडेवाडी, मेजर संदिय माळी, मेजर दिगंबर हारगे, प्रतिक पोतदार, डॉ. संजय कुसनाळे, सतिश खोत पत्रकार सुनिल पाटील, बाळासाहेब गुरव, बंटी चव्हाण, डॉ. एकलदेवी सलगरे उपस्थित होते. शाखेच्या चांगल्या सेवेबद्दल ग्रामस्थानी शाखाधिकारी विभागीय अधिकारी व सेवकांचा सत्कार केला.

या कार्यक्रमास संस्थेचे संचालक अ. के. चौगुले (नाना) लालासो भाऊसो थोटे, डॉ. अशोक सकळे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार श्री. राजेंद्र गेंड यांनी मानले. सुत्रसंचलन संजय सासणे यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.