Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाच अशोक चव्हाणांचा फोन वाजला अन् सर्व मंत्र्यांची झोपच उडाली

 मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाच अशोक चव्हाणांचा फोन वाजला अन् सर्व मंत्र्यांची झोपच उडाली


मुंबई : राज्यात जशी करोनाची लाट सुरु झाली आहे तसे या लाटेत सर्वसामान्यांसोबत राजकारण्यांनाही करोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका वृत्त वाहिनीने याविषयी माहिती देताना म्हटले आहे कि, अशोक चव्हाण मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. याचवेळी त्यांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आणि त्यांना तात्काळ बैठक सोडली.

दर आठवड्याला बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडते. पण यावेळी प्रजासत्ताक दिन असल्याने ही बैठक गुरुवारी घेण्यात आली. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय घ्यायचे असल्याने मंत्र्यांनी केलेल्या आग्रहानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठीकाला अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. याचवेळी अशोक चव्हाण यांचा फोन वाजला आणि तिथे उपस्थित सर्व मंत्र्यांची झोपच उडाली. कारण अशोक चव्हाण यांना करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.रिपोर्ट हाती येताच अशोक चव्हाण यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. महत्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीआधी अशोक चव्हाण यांनी प्रभारींच्या नेतृत्वात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीतही उपस्थिती नोंदवली होती. दरम्यान अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.