लोकपाल आयोगाचे सदस्य मा. दिनेश जैन यांची
दक्षिण भारत जैन सभा कार्यालयास सदिच्छा भेट
सांगली : जैन धर्मात दात्रुत्वाला अनन्यसाधारण महत्व आहे. देत असलेल्या व्यक्तीचे भले व्हावे म्हणून दान देत असलो तरी त्या व्यक्तीवर आपण कोणतेही उपकार करीत नसतो. ते आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे मुलभूत गुण आपल्या अंगी असतात म्हणून आपल्या हातून असे सत्कर्म घडत असते. आपण मिळविलेली संपत्ती, मालमत्ता याचे आपण फक्त निमित्तमात्र आहोत. म्हणून दातृत्वाला जैन धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अशा या दातृत्वाच्या जोरावर आपली ही संस्था समाजाभिमुख कार्य अत्यंत अभिमानास्पदरीत्या करीत आहे. सभेचे कार्य येथून पुढील काळात आणखी वाढावे तिचे कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत वंचित समाजासाठीही आणखी कार्य व्हावे यासाठी माझ्या मन:पुर्वक शुभेछ्या आहेत असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यसचिव व दिल्ली लोकपाल आयोगाचे सदस्य श्री. डी.के.जैन यांनी काढले.
ते दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली येथील मध्यवर्ती कार्यालयाला दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सदिच्छा भेट दिली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी तसेच तहसिलदार श्री. कुंभार उपस्थित होते.
सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते मा. दिनेश जैन यांचा शाल, श्रीफळ व बुके देवून सन्मान करण्यात आला. मा. अभिजीत चौधरी व तहसिलदार श्री. कुंभार साहेब, सिद्धक्षेत्र मांगीतुंगीचे ट्रस्टी श्री. काला यांचा सन्मान चेअरमन श्री.रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांचे हस्ते झाले. दक्षिण भारत जैन सभेने कोरोना आणि महापुराच्या काळात केलेल्या कार्याचे कौतुक करून प्रशासनाला या संस्थेचे सदैव सहकार्य असते, असे उद्गार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काढून सभेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
मान्यवरानी सभेच्या पदवीधर संघटनेमार्फत चालू असलेल्या श्री. आर.पी. पाटील अॅ़कॅडमीला भेट देवून कामकाजाची माहिती घेतली, विद्यार्थ्यांशी हितगुज करून अकॅडमीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सुरूवातीला सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी स्वागत करून सभेच्या विविध कार्याची माहिती दिली. मुख्यमहामंत्री डॉ. अजित ज. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. चंद्रकांत चौगुले यांनी आभार मानले. यावेळी मांगीतुंगी सिद्धक्षेत्राचे ट्रस्टी श्री. काला, सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, विभागीय ट्रस्टी पोपटलाल डोर्ले, महामंत्री शांतिनाथ नंदगावे, सचिन पाटील (धामणी), शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.