Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ अमोल कोल्हे कोणती भूमिका साकारायची हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. नाना पाटेकर

 डॉ अमोल कोल्हे कोणती भूमिका साकारायची हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. नाना पाटेकर


पुणे: अभिनेता, राष्ट्रवादीचे नेते, स्वतः अमोल कोल्हे हे सध्या वादाच्या भावऱ्यात सापडले आहेत. 'मी गांधींना का मारले या चित्रपटात अमोल कोल्हे नथुराम गोडसे यांनी भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. यावर बोलताना, डॉ. अम् कोल्हे हे अभिनेते आहेत कोणती भूमिका साकारणे अंतिमतः त्यांचा प्रश्न आहे. असे बोलून नाना पाटेकर यांनी अभिनेते अमोल कोल्हे यांचे समर्थन केले आहे. नाना पाटेकर आज जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कोविड गाव मुक्त अभियान च्या कार्यक्रमाला हजर झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले कोविड गाव मुक्त अभियान हा उत्तम कार्यक्रम सरकार राबवत आहे लवकरात लवकर गाव कोविड मुक्त होतील तशी आपल्याला पहिल्यासारखे आयुष्य जगता येईल मी स्वतःहा जसे स्वच्छ गाव ही संकल्पना करण्याचा उपक्रम राबवला आहे. तसे प्रत्येकाने मनात ही संकल्पना राबवून हा उपक्रम राबविला पाहिजे असे नाना पाटेकर म्हणाले.

महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत त्यावर नाना पाटेकर म्हणाले, महानगरपालिका निवडणूक म्हटल की विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षात हाणामारी होणारच. उमेदवार हा पदवीधर पाहिजे व प्रत्येक पक्षाने पदवीधर उमेदवार आपला निवडणुकीत दिला पाहिजे अस ते म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.