Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा मुला-मुलींच्या वस्तीगृहास सांगली येथील भूखंड मिळावा - पृथ्वीराज पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र

मराठा मुला-मुलींच्या वस्तीगृहास सांगली येथील भूखंड मिळावा  - पृथ्वीराज पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र


सांगली, दि. १९ :  मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वस्तीगृह सुरू करण्यासाठी सांगलीतील भूखंड मिळावा अशी मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि मराठा समाज यांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना विनंती पत्र देऊन करण्यात आली.

 पत्रात म्हटले आहे की, मराठा क्रांती मोर्चा सांगली यांच्यावतीने गेल्या काही वर्षांपासून वस्तीगृहाची मागणी केली जात आहे.  जिल्हा प्रशासनाच्यावतीने तात्पुरते वसतिगृह सुरू करण्यात आले होते, परंतु ते सध्या  बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींची मोठी गैरसोय होत आहे, ती दूर करण्यासाठी व वस्तीगृहाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी सांगली येथील एक भूखंड मिळावा यासाठी मा. जिल्हाधिकारी, सांगली यांना मागणी करण्यात आली आहे. 

सदर भूखंडावर वस्तीगृहाबरोबरच भविष्यात सारथी संस्थेचे कार्यालय, मराठा मुला-मुलींच्याकरीता स्वतंत्र अभ्यासिका, ग्रंथालय अशा विविध सामाजिक उपक्रमांसाठी या भूखंडाचा यथायोग्य वापर होवू शकेल.

तरी मराठा समाजाच्यावतीने होत असलेल्या भूखंडाच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करून सदरचा भूखंड सारथी संस्थेस उपलब्ध करून द्यावा.

यावेळी डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, विलास देसाई, अमोल सुर्यवंशी, योगेश पाटील, राहूल पाटील, अजय देशमुख, रवी खराडे आदि मान्यवर उपस्थित होते.  सदर पत्राची प्रत माहितीसाठी व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे यांनाही देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.