Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोनाची साथ नजीकच्या काळात संपण्याची शक्यता नाही; जागतिक आरोग्य संघटनेेचा इशारा

 कोरोनाची साथ नजीकच्या काळात संपण्याची शक्यता नाही; जागतिक आरोग्य संघटनेेचा इशारा


जिनेव्हा : कोरोनाची साथ नजीकच्या काळात संपण्याची शक्यता नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी दिला. काही देशांमध्ये अगदी कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे.

त्याबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले की, ओमायक्रॉन हा कमी घातक आहे, असा अनेक जणांचा गैरसमज झाला आहे. या नव्या विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरला. ओमायक्रॉनमुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग होतो, या म्हणण्यात फारसे तथ्य नाही. ओमायक्रॉनमुळे बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. या विषाणूच्या संसर्गाने मृत्यूही होत आहेत. घेब्रिसस म्हणाले की, काही देशांमध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. पण त्यामुळे घाबरून न जाता साथीवर मात करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

निरोगी मुलांना बूस्टर डोसची गरज नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, निरोगी मुलांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. कोरोना विषाणूच्या प्रत्येक प्रकारासाठी नवी लस तयार करण्याची आवश्यकता नाही. अमेरिका, जर्मनी, इस्रायलने मुलांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. भारताने १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले. त्या पार्श्वभूमीवरील प्रश्नाला सौम्या स्वामीनाथन यांनी उत्तर दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.