Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरेगाव भीमाचा लढा पेशव्यांविरोधात नव्हता तर. नव्या पुस्तकावरून वाद

 कोरेगाव भीमाचा लढा पेशव्यांविरोधात नव्हता तर. नव्या पुस्तकावरून वाद


पुणे : कोरेगाव भीमाची लढाई पेशव्यांच्या विरोधात नव्हती, असा दावा '1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव' या नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जयस्तंभाचे इन्चार्ज जमादार खंडोजी माळवदकर यांचे सातवे वंशज असलेल्या अॅड. रोहन जमादार माळवदकर यांनी हे नवे पुस्तक लिहिले आहे.

1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा परिसरात इंग्रज आणि मराठा सैन्यात लढाई झाली. इंग्रजांचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटनकडे होते. बॉम्बे नेटिव्ह इन्फन्टरी, मद्रास आर्टिलरी आणि पूना ऑक्सिलरी हॉर्स या पलटणी इंग्रजी सैन्यात होत्या. त्यांच्या सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते. मराठा सैन्यातही विविध जाती धर्माचे सैनिक होते.

ही लढाई पेशव्यांच्या विरोधात नव्हती. ती केवळ एक अचानक झालेली चकमक होती. ब्रिटिशांनी स्वतःचा बचाव केला आणि तसा उल्लेखही जयस्तंभावर आहे. तरीही जाती अंताच्या नावाखाली समाजात जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने कोरेगावच्या लढाईचा खोटा इतिहास मांडला जातो, असा दावा अॅड. माळवदकर यांनी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.