Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्मृती मानधना, अजितकुमार कोष्टी आणि डॉ दिलीप पटवर्धन आणि माधवी पटवर्धन महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर : मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून घोषणा

स्मृती मानधना, अजितकुमार कोष्टी आणि डॉ दिलीप पटवर्धन आणि माधवी पटवर्धन महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर : मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून घोषणा


सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधरासाठी ब्रँड अँबेसिडरची घोषणा करण्यात आली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी याबाबतची घोषणा केली.

यामध्ये महिला क्रिकेट कर्णधार स्मृती मानधना, हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी, नेत्ररोग तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन व माधवी पटवर्धन दाम्पत्याची महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 साठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाल्यानंतर हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांनी महापलिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा साठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी सांगली महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 


निवडीनंतर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते ब्रँड अँबेसिडर हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांचा सत्कारही संपन्न झाला. 

     सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधराची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 22 उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग यावा यासाठी मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहे. या 22 उपक्रमाची जाणीव जागृती व्हावी यासाठी सांगलीचे नाव राज्य व देशस्तरावर उज्वल करणाऱ्या व्यक्तींची सांगली महापालिकेकडून स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 आणि माझी वसुंधरासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिले होते. यानुसार  महिला क्रिकेट कर्णधार स्मृती मानधना, हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी आणि नेत्ररोग तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन व माधवी पटवर्धन दाम्पत्याची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी  चौघांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. यापैकी अजितकुमार कोष्टी यांचा आयुक्त कापडणीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ब्रँड अँबेसिडर अजितकुमार कोष्टी यांनी महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा साठीच्या 22 उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपल्या महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके आणि मनपा आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, अविनाश पाटणकर , फायर ऑफिसर विजय पवार , वैभव वाघमारे आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.