Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी


मुंबई  : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. महागाई भत्त्यात बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महागाई भत्त्याच्या मोजणीचे सूत्र बदलले आहे.

त्यामुळे आता तुमचा पगार किती येईल हे जाणून घ्या.

2016 मध्ये महागाई भत्त्याचे मूळ  वर्ष बदलण्यात आले आहे. मंत्रालयाने वेतन दर निर्देशांकची  नवीन सीरीज जारी केली आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की मूळ वर्ष 2016=100 असलेली WRI ची नवीन मालिका मूळ वर्ष 1963-65 च्या जुन्या सीरीजची जागा घेईल. म्हणजेच आता महागाई भत्ता मोजण्याची पद्धत  बदलणार आहे.

सरकारकडून आधारभूत वर्ष सुधारित

महत्त्वाचे म्हणजे, चलनवाढीच्या आकडेवारीच्या आधारे, सरकार वेळोवेळी प्रमुख आर्थिक निर्देशकांसाठी आधारभूत वर्ष सुधारित करते. अर्थव्यवस्थेत होत असलेल्या बदलांच्या आधारे हे केले जाते आणि कामगारांच्या वेतन पद्धतीचा समावेश केला जातो. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO), राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या शिफारशींनुसार, वेतन दर निर्देशांकाचे मूळ वर्ष 1963-65 ते 2016 पर्यंत बदलून त्याची व्याप्ती वाढवून निर्देशांक अधिक कार्यक्षम बनवण्यात आला आहे.

महागाई भत्ता कसा मोजला जातो?

साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता बदलला जातो. सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला मूळ वेतनाशी गुणाकार करुन, महागाई भत्त्याची रक्कम ठरवली जाते.

महागाई भत्ता (DA) म्हणजे काय?

महागाई भत्ता हा असा पैसा आहे, जो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहणीमानाचा खर्च सुधारण्यासाठी दिला जातो. वाढत्या महागाईनंतरही कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये, म्हणून हे पैसे कर्मचाऱ्यांना दिले जातात. हा पैसा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.