Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून ड्रायपोर्ट होणे अत्यंत गरजेचे

सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून ड्रायपोर्ट होणे अत्यंत गरजेचे


सांगली :  जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून ड्रायपोर्ट होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी एमआयडीसी ,महाराष्ट्र सरकार व जेएनपीटी यांच्यामध्ये दि. २४.०४.२०१८ रोजी सामंजस्य करारही झालेला आहे. परंतु गेल्या ३ वर्षापासून या कामामध्ये कोणतीही सुरुवात झालेली नाही. तरी कृपया पुढाकार घेऊन सदर ड्रायपोर्ट हा त्वरित होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्याच्या व आसपासच्याभागामधून साखर ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. त्याचप्रमाणे सांगलीतून डाळिंब, हळद, बेदाणे, केळी,मका पावडर असे अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात.

त्याचप्रमाणे सांगलीच्या जवळ सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमधून व कर्नाटकातील बागलकोट, विजयपूर, बेळगाव, हुबळी येथूनहे सर्व घटक मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात. परंतु सध्या जयगड बंदर हे सांगली पासून २०६ किलोमीटर दूर आहे. त्याचप्रमाणे मुंबई जेएनपीटी हेही पाचशे किलोमीटर दूर आहे. त्या ठिकाणीकंटेनर वाहतूक करणे आणि ड्रायपोर्ट मध्ये २-३ दिवस थांबावे लागत असल्यामुळे निर्यातदारांना प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागते. व त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होते व पर्यायाने दर कमी मिळतो. सांगली जिल्ह्याच्या रांजणी ता. कवठेमहांकाळ याजागेमध्येड्रायपोर्ट त्वरित विकसित झाले, तर या सर्वच लोकांना फार मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि त्याचप्रमाणे या भागातील नागरिकांना रोजगार निर्मितीची सुद्धा संधी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशी सातत्याने आम्ही मागणी करीत आहोत. तरी यामध्ये तातडीने लक्ष घालून सदर ड्रायपोर्ट त्वरित सुरू होण्याबाबत श्री. उन्मेश वाघ व्हा. चेअरमन (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.तसेच याप्रसंगी त्यांनी केंद्र शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे मल्टी मॉडेल लॉजिस्टिकपार्क करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणून मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत भेट घेऊन ‘ड्रायपोर्ट’ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘सांगली व्हिजन@७५’ फोरमचे मुख्य समन्वयक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.