राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजसह कोचिंग क्लासेसही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाला याविषयीचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेसोबतच कॉलेज आणि कोचिंग क्लासेससाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी ऑनलाइन वर्ग मात्र सुरू राहणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी ३१ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण वाढती रुग्णसंख्या पाहता आता १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार गेला आहे, तर एकट्या मुंबईने २० हजारांचा आकडा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. तर सकाळी ५ ते रात्री ११ जमावबंदी लागू असेल. राज्यातील शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
याआधी मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांमधील शाळा कोरोना रुग्णसंख्येमुळे बंद होत्या. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या ठिकाणी शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर सरसकट सर्व जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पाहता या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.