अतिथीगृह इमारतीमधील
बांधकाम राडारोड्यातून साकारला वॉकिंग ट्रॅक : आयुक्त कापडणीस यांच्या संकल्पनेतून राडारोड्याचा होतोय पुनर्वापर
सांगली : माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून बांधकाम राडारोड्यातून एक किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक तयार करून बांधकाम राडारोड्याचा चांगल्या पद्धतीने पुनर्वापर केला आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिथीगृह इमारतीमधील ३० ते ४० टन (बांधकाम राडारोडा) हा १ किलो मीटर पादचारी मार्ग करण्यासाठी वापरण्यात आला. यापुढेही शहरातील बांधकाम राडारोड्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका पर्यावरण पूरक धोरण राबवित आहे. यातूनच या बांधकाम राडारोड्यातून वॉकिंग ट्रॅक बनविले जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.