Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटल चौकाची रुंदी वाढणार : चौक रुंदीकरण कामाला गतीने सुरवात: महापौर आयुक्त यांच्या प्रयत्नामुळे सिव्हिल चौक घेणार मोकळा श्वास

सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटल चौकाची रुंदी वाढणार : चौक रुंदीकरण कामाला गतीने सुरवात: महापौर आयुक्त यांच्या प्रयत्नामुळे सिव्हिल चौक घेणार मोकळा श्वास


सांगली : सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटल चौकाचे रुंदीकरण काम सांगली  महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.  महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रयत्नामुळे लवकरच सिव्हिल हॉस्पिटल चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रतीक्षा असणारे हे काम आता पूर्णत्वाला येत आहे. याबद्दल नागरिकांतून समाधानाचे वातावरण आहे.

   सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल चौक हा मध्यवर्ती आहे. याचबरोबर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा आहे. याचबरोबर या चौकाच्या आजूबाजूला अनेक दवाखाने आणि मोठ्या आस्थापना असल्याने वर्दळ आणि गर्दी मोठी असते. यामुळे चौकात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता. मास्टर प्लॅनमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचौकाची रुंदी चारही बाजूनी 5 मीटरने वाढते. यामुळे चारही बाजूला विनाथांबा डावा वळण मार्ग उपलब्ध होणार आहे. याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी बांधकाम विभाग, सिव्हिल प्रशासन आणि वाहतूक शाखा यांच्याशी समनव्यक साधत सिव्हिल हॉस्पिटल चौकाच्या रुंदीकरनाचे काम हाती घेतले. सुरवातीला या चौकातील बंद सिग्नल हटविण्यात आले. त्यानंतर चारही बाजूनी रस्त्याचे मोजमाप करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी या कामाची पाहणी करत काम लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. 

यानुसार सिव्हिल चौकाच्या रुंदीकरणाचे काम जोरदारपणे सुरू असून लवकरच चारही बाजूनी चौक रुंद झाल्यानंतर या चौकातील वाहतूक कोंडी संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. पाहणीवेळी उपायुक्त राहुल रोकडे, नगर अभियंता आप्पा अलकुडे, वाहतूक शाखेच्या सपोनि देशमुख , पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील, उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक, अभियंता वैभव वाघमारे, महेश मदने, दीपक पाटील आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.