Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्टॅलिनच्या क्रूर प्रशासनाची कहाणी सांगणाऱ्या इतिहासकाराला का झाली शिक्षा?...

 स्टॅलिनच्या क्रूर प्रशासनाची कहाणी सांगणाऱ्या इतिहासकाराला का झाली शिक्षा?...


 सोव्हिएतचे नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या क्रूर शासनाबाबतचं सत्य जगासमोर मांडणाऱ्या रशियातील व्यक्तीची ही कहाणी आहे.

रशियाचे प्रसिद्ध इतिहासकार युरी दिमित्रीएव्ह हे दीर्घकाळापासून स्टॅलिनच्या शासन काळातील इतिहास सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

यामध्ये गुलाग (मजुर शिबिर) हजारो लोकांना कैद करून ठेवण्यापासून ते राजकीय हत्यांपर्यंतच्या अशा अनेक प्रकरणांसंबधीच्या माहितीचा समावेश आहे.

मात्र, गेल्या सोमवारी रशियातील पेत्राजाव्होद्स्क या शहरातील एका न्यायालयानं युरी दिमित्रीएव्ह यांना लैंगिक शोषणाशी संबंधित एका प्रकरणामध्ये 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

रशियाचे शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर टॅक्सी चालवण्याची वेळ आली होती, कारण...

रशियाचं सैन्य युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे?

अमेरिकेच्या 'या' घातक शस्त्राने अफणागिस्तानातल्या रशियन सैन्याला उद्धवस्त केलं होतं

मात्र, त्यांचे समर्थक आणि नातेवाईक हे हा प्रकार राजकीय कटाचा भाग असल्याचं मानतात. त्यांना स्टॅलिन सरकारचे गुन्हे सर्वांसमोर आणण्यापासून रोखता यावं यासाठी हा कट असल्याचं त्यांचं मत आहे.

2016 मध्ये झाली होती अटक

रशियाच्या सरकारी एजन्सीनं 2016 मध्ये दिमित्रीएव्ह यांच्या घरी छापेमारी करत एक कॉम्प्युटर जप्त केला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात चाइल्ड पोर्नोग्राफीचं प्रकरण दाखल करण्यात आलं होतं.

दत्तक घेतलेल्या मुलीच्या स्थितीबाबत सरकारी संस्थेला माहिती देता यावी म्हणून हे फोटो घेण्यात आले होते, असं त्यांचं म्हणणं आहे.


तज्ज्ञांनी असंही म्हटलं की फोटोमध्ये पोर्नोग्राफिक साहित्य नव्हतं, त्यानंतर न्यायालयानं त्यांच्या विरोधात लावलेले आरोप मागं घेतले होते.

मात्र, ते फोटो त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलीचे असल्याचं दिमित्रीएव्ह आणि त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.


मात्र, त्यानंतर पुन्हा याविरोधात अपील करण्यात आलं आणि त्यानंतर हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं. त्यानंतर त्यांना 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याच महिन्यात सरकारी पक्षानं केलेल्या अपीलानंतर सोमवारी त्यांच्या शिक्षेत आणखी दोन वर्षे वाढवून 15 वर्षे करण्यात आली.

                                                    कोण आहेत दिमित्रीएव्ह?

1956 मध्ये फिनलँडच्या जवळ असलेल्या करेलिया गणराज्यातील पेत्राजावोद्स्क शहरात जन्म घेणारे युरी दिमित्रीएव्ह यांना सोव्हिएत संघाच्या एका सैनिकानं दत्तक घेतलं होतं.

गुलागचं जन्मस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलोव्हत्सकी बेटाच्या जवळ असलेल्या या भागामध्ये लाखो कैद्यांना ठार करण्यात आलं होतं.

एवढंच नाही, तर याच भागात स्टॅलिनच्या पंचवार्षिक योजनेसाठी तथाकथित व्हाइट सी चॅनल खोदण्यामध्ये लोकांनी प्राण गमावले होते.

अधिकृत अंदाजांनुसार याकाळामध्ये जवळपास 7 लाख लोकांना ठार करण्यात आलं होतं.

सोव्हिएत संघाच्या पतनानंतर स्थानिक सरकारसाठी सल्लागार म्हणून काम करत असताना दिमित्रीएव्ह यांना अनेक प्रकारची कागदपत्र मिळाली होती.

त्यांच्या आधारे त्यांनी पहिली सामूहिक कबर शोधली होती. त्याद्वारे स्टॅलिन काळातील गुलाग आणि सामूहिक हत्यांशी संबंधित माहिती समोर आली होती.

त्यांच्या कामामुळं रशियामध्ये असलेल्या संदरमॉख आणि क्रांसी बोर या दोन सर्वात मोठ्या यातना शिबिरांच्या बाबत माहिती मिळाली होती.

युरी दिमित्रीएव्ह यांनी याठिकाणी एक अनौपचारिक स्मारक तयार केलं आणि पीडितांची ओळख पटवायला सुरुवात केली.

रशिया आणि जगभरात युरी दिमित्रीएव्ह यांना स्टॅलिनच्या काळातील मानवाधिकारांचं उल्लंघन आणि शोषण जगासमोर आणणारे इतिहासकार म्हणून ओळखलं जातं.

कोणते गुन्हे दाखल?

दिमित्रीएव्ह यांना ज्या प्रकरणात शिक्षा मिळाली आहे, त्यावर जवळपास पाच वर्षांपासून सुनावणी सुरू आहे.

दिमित्रीएव्ह यांना सर्वात आधी 2016 च्या डिसेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी छापा मारला त्यात एक कॉम्प्युटर जप्त करण्यात आला होता. त्यात एका अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो होते.

त्याच्या पुढच्या वर्षी दिमित्रीएव्ह यांच्या विरोधात बंदुकीचे सुटे भाग अवैधरित्या ठेवल्याचं प्रकरण दाखल करण्यात आलं होतं.

विवस्त्र फोटोच्या प्रकरणामध्ये तज्ज्ञांनी हो फोटो बाल लैंगिक शोषणाशी संबंधित समजता येणार नाही असं म्हटलं होतं.

त्यानंतर त्यांच्यावरील सर्व आरोप हटवले. मात्र अवैधरित्या बंदूक बाळगल्याचा आरोप त्यांच्यावर कायम राहिला.

त्यानंतर दोन महिन्यांनी स्थानिक न्यायालयानं या प्रकरणाशी संबंधित तपास अधिकारी आणि दिमित्रीएव्ह यांच्या 12 वर्षांच्या मुलीदरम्यान झालेल्या चर्चेच्या आधारे हा निर्णय पलटला होता.

त्यानंतर हे प्रकरण पुन्हा कोर्टात पोहोचलं. त्या 'चुकीच्या पद्धतीनं स्पर्श' केल्याशी संबंधिक लैंगिक शोषणाचं प्रकरणही जोडण्यात आलं. मात्र दिमित्रीएमव्हनं सगळे आरोप फेटाळले.

अनेक रशियन आणि विदेशातील दिग्गजांनी दिमित्रीएव्ह यांना तुरुंगात टाकल्याचा निषेध केला आहे.

तसंच दिमित्रीएव्ह यांची शिक्षा आणि त्यांच्यावर लागलेले आरोप हे पुतिन सरकारनं वेगवेगळ्या वेळी केलेल्या धोरणाचा भाग असल्याचं म्हटलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.