Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरोगसी म्हणजे स्वार्थी श्रीमंतांचा अहंकार! तस्लिमा नसरीन यांची पोस्ट चर्चेत

 सरोगसी म्हणजे स्वार्थी श्रीमंतांचा अहंकार! तस्लिमा नसरीन यांची पोस्ट चर्चेत


दोन दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांनी आई-बाबा झाल्याची घोषणा केली. सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिल्याचं या दोघांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. अशात आता लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या प्रक्रियेवर म्हणजेच सरोगसीवर टीका केली आहे. सरोगसी प्रकियेद्वारे आई आणि वडील होणाऱ्यांच्या भावनांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्विटर या सोशल माध्यमावर ट्विट करत त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

काय म्हणाल्या आहेत तस्लिमा नसरीन?

सरोगसीच्या माध्यमातून आईला तिचं रेडीमेड मूल मिळतं. त्यानंतर त्यांना कसं वाटतं? जी आई मुलाला जन्म देते तशाच सरोगसीच्या माध्यमातून आई होणाऱ्या आईच्या भावना असतात का? गरीब महिलांमुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोक त्यांच्या स्वार्थासाठी नेहमीच गरीबांचा असा फायदा घेतात. जर तुम्हाला मूल वाढवायचंच असेल तर मूल दत्तक घ्या. बेघर मुलांना दत्तक घ्या. मुलांना तुमचे गुण वारसा हक्काने मिळआले पाहिजेच हा स्वार्थीपणा आहे आणि यातून फक्त तुमचा इगो दिसून येतो बाकी काहीही नाही. या आशयाचं ट्विट तस्लिमा नसरीन यांनी केलं आहे.

पुढच्या एका ट्विटमध्ये तस्लिमा म्हणतात...

'मी सरोगसी तोपर्यंत मान्य करणार नाही जोपर्यंत श्रीमंत महिलाही सरोगेट मदर होत नाहीत. मी बुरखा तोपर्यंत मान्य करणार नाही जोपर्यत पुरूष तो प्रेमाने परिधान करणार नाहीत. मी वेश्याव्यसाय तोपर्यंत मान्य करणार नाही जोपर्यंत पुरूष वेश्या असलेले पुरूष महिला ग्राहकांची वाट बघत असलेले दिसत नाहीत. हे घडत नाही तोपर्यंत सरोगसी, बुरखा, वेश्याव्यवसाय हे सगळं महिलांचं आणि गरीबांचं शोषण आहे.' या आशयाचं ट्विटही तस्लिमा यांनी केलं आहे.सोशल मीडिया युजर्सनी ही व्यक्तिगत निवड आहे आणि बऱ्याच बाबतीत लोक वैद्यकीय कारणांसाठी सरोगसीचा पर्याय निवडतात असे म्हटले आहे. मात्र, तस्लिमा यांनी प्रियंका चोप्राच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण त्याचे हे ट्विट प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या घोषणेनंतर आले आहे. प्रियांका आणि निक यांनी सरोगसीद्वारे पालक बनल्याची घोषणा केली होती. त्यामुळे सोशल मीडिया युझर्स या ट्विटचा संबंध प्रियंका निकच्या घोषणेशी लावत आहेत.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसीचे ट्रॅडिशनल आणि जेस्टेशनल असे दोन प्रकार आहेत. ट्रॅडिशनल सरोगसीमध्ये होणाऱ्या बाळाच्या पित्याच्या शुक्राणूंचं सरोगेट मदरच्या बीजांडाशी मिलन घडवलं जातं. त्यामुळे संबंधित महिला ही जन्माला येणाऱ्या बाळाची जैविक आई अर्थात बायोलॉजिकल मदर असते. जेस्टेशनल सरोगसीमध्ये मात्र सरोगेट मदरचं आणि बाळाचं रक्ताचं नातं नसतं. होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांच्याच अनुक्रमे बीजांड आणि शुक्राणूचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. त्यातून तयार झालेला भ्रूण टेस्ट ट्यूबद्वारे सरोगेट मदरच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.