दैनिक लोकमतचे नंदकिशोर वाघमारे यांना प्रतिष्ठा फौंडेशनकडून राज्यस्तरीय उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित
दैनिक लोकमतचे छायाचित्रकार नंदकिशोर वाघमारे यांना प्रतिष्ठा फौंडेशनकडून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूर काळात व कोरोनाच्या लाटेवेळी छायाचित्रकार नंदकिशोर वाघमारे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी छायाचित्रे घेतली होती. यांनी काढलेल्या छायाचित्रांमुळे वाचकांना घरबसल्या परिस्थितीचे गांभीर्य समजत होते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने प्रेरित होऊन नंदकिशोर वाघमारे कार्यरत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन प्रतिष्ठान फाउंडेशनने उत्कृष्ट छायाचित्रकार राज्यस्तरीय पुरस्कार 2022 ने सन्मानित केले आहे.
तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते नंदकिशोर वाघमारे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी सॅलरी सोसायटीचे माजी चेअरमन लालासाहेब मोरे ,प्रतिष्ठा फाऊंडेशनचे तानाजीराजे जाधव, जेष्ठ साहित्यक भिमराव धुळुबुळु , शासकीय दूध प्रकल्पचे सेवानिवृत्त अधिकारी सुहास सूर्यवंशी, प्रभावती वाघमारे ,सामनाचे छायाचित्रकार रवींद्र काळेभेरे, हरिभाऊ खबालेसर ,सुरज वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.